Join us  

ब्रेक्झिटचे परिणाम गंभीर!

By admin | Published: July 02, 2016 4:10 AM

युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयामुळे (ब्रेक्झिट) लक्षणीय अनिश्चितता निर्माण झाली आहे.

वॉशिंगटन : युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयामुळे (ब्रेक्झिट) लक्षणीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचा केवळ ब्रिटन आणि युरोपवरच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस यांनी सांगितले की, बेक्झिटमुळे नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेची वाढ खुंटण्याचा धोका आहे. या स्थितीचा सामना करण्यास धोरणे ठरविणाऱ्यांनी निर्णायक पद्धतीने सामना करण्यासाठी तयार राहायला हवे. ब्रिटनच्या आर्थिक वाढीवर या निर्णयाचे गंभीर परिणाम होतील; पण हे परिणाम केवळ ब्रिटनपुरतेच मर्यादित राहतील, असे नव्हे, युरोपलाही त्याचा फटका बसेल, तसेच जागतिक अर्थव्यवस्थाही या तडाख्यातून वाचणार नाही.राईस म्हणाले, नजीकच्या काळात सूक्ष्म अर्थशास्त्र व भांडवली बाजारावर परिणाम जाणवेल. राजकीय आघाडीवर अनिश्चिता निर्माण होण्याचाही धोका आहे. तसे झाल्यास संकटात आणखी भर पडेल. ब्रिटन व युरोपीय संघाच्या संबंधांवर गंभीर परिणाम होतील. दोघांचे संबंध किती लवकर सामान्य होतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ब्रिटन आणि युरोपीय संघ या दोघांनीही संयम दाखवायला हवा. या परिस्थितीत अर्थव्यवस्थेत पुरेसा निधी राहण्यासाठी, तसेच अतिरिक्त खर्चावर कपात करण्यासाठी बँक आॅफ इंग्लंड, युरोपीय सेंट्रल बँक, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आणि बँक आॅफ जपान यांनी जी पावले उचलली आहेत, तसेच आपली बांधिलकी व्यक्त केली आहे, त्याला नाणेनिधी पाठिंबा देते, असेही राईस यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)>ब्रेक्झिटच्या धक्क्यातून भारत सावरलाब्रेक्झिटच्या झटक्यामधून अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत लवकर सावरला. अनिश्चिततेचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतात. ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांना संकटांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. - जीम योंग कीम, अध्यक्ष, जागतिक बँकजागतिक पातळीवर धोरणे ठरविणारांनी तयार राहिले पाहिजे. अनिश्चिततेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गतीच मंद होणार असेल, तिचा ठोस निर्णय घ्यावे लागतील. दीर्घकालीन अनिश्चितता ग्राहक आणि व्यावसायिकांचा आत्मविश्वास तोडण्याचे काम करतो. त्याविरुद्ध योग्य ते निर्णय घेणे आवश्यक ठरेल.- गेरी राईस, प्रवक्ते, नाणेनिधी1अब्ज डॉलरचे कर्ज जागतिक बँकेकडून भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मंजूर करण्यात असून, त्या पार्श्वभूमीवर कीम भारताच्या दौऱ्यावर आले होते.