Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger Stock : शेअर बाजारात बूम; 'या' पेनी स्टॉकनं वर्षभरात १ लाखाचे केले १८ लाख

Multibagger Stock : शेअर बाजारात बूम; 'या' पेनी स्टॉकनं वर्षभरात १ लाखाचे केले १८ लाख

Multibagger Stock Share Market : सध्या शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनंही उत्तम रिटर्न्स दिल्याचं दिसून येतंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 11:25 PM2021-11-06T23:25:09+5:302021-11-06T23:25:34+5:30

Multibagger Stock Share Market : सध्या शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्यांच्या शेअर्सनंही उत्तम रिटर्न्स दिल्याचं दिसून येतंय.

brightcom group share price penny stock turned multibagger in one year make 1 lakh in to 18 lakh tata elxsi | Multibagger Stock : शेअर बाजारात बूम; 'या' पेनी स्टॉकनं वर्षभरात १ लाखाचे केले १८ लाख

Multibagger Stock : शेअर बाजारात बूम; 'या' पेनी स्टॉकनं वर्षभरात १ लाखाचे केले १८ लाख

सध्या शेअर बाजारात (Share Market) मोठी तेजी दिसून येत आहे. दुसरीकडे पाहायचं झालं तर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्य़ा कंपन्यांच्या शेअर्सनंही (Shares) मोठ्या प्रमाणात रिटर्न्स दिले आहे. अशातच एका पेनी स्टॉकनं वर्षभरात १७०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले आहेत. डिजिटल मार्केटिंग कंपनी Brightcom Group चा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) दिवाळीच्या महुर्त ट्रेडिंग दरम्यान ७५.४० रूपयांपर्यंत पोहोचला. वर्षभरापूर्वी या कंपनीचा शेअर केवळ ४.१८ रूपये इतका होता. या प्रकारे या शेअरनं एका वर्षात शेअरवर १७०५ टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 

Brightcom Group चा शेअर केवळ २०२१ या वर्षात १००२ टक्क्यांनी वाढला आहे. तर एका महिन्यापूर्वी या शेअरमध्ये १७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअरनं ९०.५५ रूपयांचा उच्चांकी स्तरही गाठला होता. जर कोणत्याही व्यक्तीनं गेल्या वर्षी Brightcom Group च्या शेअरमध्ये १ लाख रूपये गुंतवले असतील, तर त्याला सध्याच्या शेअरच्या दरानुसार १८.०३ लाख रूपये मिळाले असते. तर या कालावधीत सेन्सेक्समधील वाढ ही ४७.८९ टक्के होती.

Brightcom Group च्या शेअर्सनं आपल्या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत उत्तम रिटर्न्स दिले आहेत. या दरम्यान, TATA Elxsi ने ३०५ टक्क्यांचे रिटर्न्स दिलेत. तर दुसरीकडे Tanla Platforms नं २५९ टक्के आणि Newgen Software नं १३५.८२ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. Brightcom Group च्या पब्लिक शेअर होल्डर्सची संख्या केवळ १.०७ लाख आहे. त्यांच्याकडे कंपनीचे ८०.८३ कोटी शेअर्स आहेत. हा एक पेनी स्टॉक असून त्यातील गुंतवणूकही तितकीच जोखमीची असते. यासाठीच तज्ज्ञ यापासून वाचण्याचा सल्ला देतात.  दरम्यान शेअर्समध्ये तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचा किंवा चांगल्या गुंतवणूकदार सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.

Web Title: brightcom group share price penny stock turned multibagger in one year make 1 lakh in to 18 lakh tata elxsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.