Join us

सोन्याची चमक उतरली

By admin | Published: October 26, 2015 11:16 PM

दागदागिने तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागणीत जोर नसल्याने, तसेच जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे दिल्ली सराफा बाजारात सलग

नवी दिल्ली : दागदागिने तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागणीत जोर नसल्याने, तसेच जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे दिल्ली सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशीची सोन्याची चमक फिकी पडली. सोमवारी दिवसअखेर २० रुपयांनी घट होत सोन्याचा भाव २७,०७० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) आला. तथापि, ६० रुपयांनी झळाळत चांदीचा भाव ३७,११० रुपयांवर (प्रति किलो)गेला.जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेचे या आठवड्यात बैठक होत असून व्याजदर वाढविण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते, तर दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव ०.२ टक्क्यांनी घसरत प्रति औंस १,१६२.२५ डॉलरवर होता. राजधानी सराफा बाजारात सोन्याची चमक फिकी पडली असताना चांदीचा भाव मात्र ६० रुपयांनी झळाळला.