Lokmat Money > बिझनेस न्यूज > तिकिटांचे दर आटाेक्यात आणा; विमान कंपन्यांना सरकारची सूचना, यंत्रणा उभारण्याचे आदेश

तिकिटांचे दर आटाेक्यात आणा; विमान कंपन्यांना सरकारची सूचना, यंत्रणा उभारण्याचे आदेश

गेल्या महिनाभरापासून देशातील काही प्रमुख विमान मार्गांवर भाडे प्रचंड वाढले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 10:33 AM2023-06-06T10:33:19+5:302023-06-06T10:33:43+5:30

गेल्या महिनाभरापासून देशातील काही प्रमुख विमान मार्गांवर भाडे प्रचंड वाढले आहे.

bring the prices of tickets in control central govt notice to airlines order to set up system | तिकिटांचे दर आटाेक्यात आणा; विमान कंपन्यांना सरकारची सूचना, यंत्रणा उभारण्याचे आदेश

तिकिटांचे दर आटाेक्यात आणा; विमान कंपन्यांना सरकारची सूचना, यंत्रणा उभारण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशातील काही प्रमुख विमान मार्गांवर भाडे प्रचंड वाढले आहे. त्यावर सरकारने चिंता व्यक्त केली आहे. अशा मार्गांवर प्रवास भाड्यावर विमान कंपन्यांनी लक्ष ठेवून उचित भाडे आकारण्याबाबत यंत्रणा उभारण्याची सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे. 

या खात्याचे मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांची विमान कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत प्रतिनिधींसाेबत सुमारे तासभर बैठक झाली. त्यात प्रवासभाडे कमी कसे करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. सिंधिया यांनी या प्रतिनिधींकडे वाढलेल्या दरांबाबत चिंता व्यक्त केली. 

गाे-फर्स्टची सेवा ठप्प पडल्यानंतर प्रवास भाडे वाढले आहे. विशेषत: ज्या मार्गावर गाे-फर्स्टची सेवा हाेती, त्या मार्गावर अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने विमान कंपन्यांना या मार्गांवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. यासाठी कंपन्यांनी यंत्रणा उभारावी आणि उचित भाडे आकारण्यात येईल, हे निश्चित करावे. यावर डीजीसीएदेखील नजर ठेवेल.


 

Web Title: bring the prices of tickets in control central govt notice to airlines order to set up system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.