Join us

ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तींना एका दिवसात ५०० कोटींचं नुकसान, इन्फोसिसच्या शेअर्समुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 6:12 PM

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना सोमवारी सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाले.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना सोमवारी सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाले. सोमवारी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ९.४ टक्क्यांची मोठी घसरण झाल्यानं त्यांना हा तोटा झाला. ब्लूमबर्गन एका रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. अक्षता यांचा इन्फोसिसमध्ये ०.९४ टक्के हिस्सा आहे. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसची स्थापना त्यांचे वडील नारायण मूर्ती यांनी केली होती. इन्फोसिसनं तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नकारात्मक आऊटलूक दिल्यानंतर सोमवारी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

मार्च २०२० नंतर कंपनीच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी एक दिवसीय घसरण होती. अक्षता मूर्ती यांच्या इन्फोसिसमधील स्टेकचे मूल्य आतापर्यंत ६ हजार कोटी रुपये आहे. ऋषी सुनक यांच्या कार्यालयानं यावर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, अक्षता मूर्ती यांची संपत्ती ऋषी सुनक यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत नेहमीच वादाचा मुद्दा राहिली आहे. २०२२ मध्ये, अक्षता यांना इन्फोसिसकडून लाभांश म्हणून १२६.६१ कोटी रुपये मिळाले.

यापूर्वी टीकाअक्षता यांना यूकेमध्ये नॉन-डोमिसाइल स्टेटस आहे आणि त्या त्यांच्या परदेशातील कमाईवर कर भरत नाहीत, असं समोर आल्यानंतर यूकेमध्ये अक्षता आणि सुनक यांच्यावर टीकाही झाली होती. अक्षता यांच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे आणि त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही देशाचं दुहेरी नागरिकत्व घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी कायम त्यांच्या यूकेच्या उत्पन्नावर कर भरला आहे आणि भरत राहतील असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

टॅग्स :ऋषी सुनकइन्फोसिसशेअर बाजार