Join us

Britannia नं RBI च्या माजी गव्हर्नरांची केली अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 12:14 IST

Britannia : पाहा कोण आहेत हे गव्हर्नर, करणार स्वतंत्र आणि गैर कार्यकारी संचालक म्हणून काम

ठळक मुद्देऊर्जित पटेल हे स्वतंत्र आणि गैर कार्यकारी संचालक म्हणून पाहणार काम२०१८ मध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा दिला होता राजीनामा

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या हाती आता एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फूड कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमि़टेडनं (Britannia Industries Ltd) रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते गैर कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहणार आहेत.रिपोर्ट्सनुसार कंपनीच्या संचालक मंडळानं ऊर्जित पटेल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं (Britannia industries) दिली. याशिवाय कंपनीच्या संचालक मंडळाच्या अतिरिक्त संचालकपदी (Non-Executive) ऊर्जित पटेल यांच्या नियुक्तीला तात्काळ प्रभावानं मंजुर केल्याचं ब्रिटानियानं सांगितलं. ३१ मार्च २०२१ पासून ऊर्जित पटेल हे या पदी कार्यरत झाले आहे. तसंच ते पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच ३० मार्च २०२६ पर्यंत या पदावर राहतील. आता कंपनी यासाठी आपल्या शेअर धारकांची मंजुरी घेणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं. ऊर्जित पटेल यांनी कंपनी अधिनियम २०१३ मधील तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि SEBI (LODR) नियम २०१५ अंतर्गत असलेल्या निकषांना पूर्ण केल्याची माहिती Britannia नं दिली. यापूर्वी होते RBI चे गव्हर्नरयापूर्वी ऊर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नरपद भूषवलं आहे. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू झाला होता. परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच नोटबंदीचाही निर्णय झाला होता. सध्या ऊर्जित पटेल हे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्षदेखील आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकउर्जित पटेलअन्न