Lokmat Money > बिझनेस न्यूज > ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा १ हजार कोटींचा प्रकल्प

ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा १ हजार कोटींचा प्रकल्प

नेहमीच्या वापरातील ग्राहकोपयोगी खाद्यपदार्थ (एफएमसीजी) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज महाराष्ट्रातील रांजणगाव येथील फूड पार्कमधील आपल्या प्रस्तावित प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:58 AM2017-08-09T00:58:57+5:302017-08-09T00:59:09+5:30

नेहमीच्या वापरातील ग्राहकोपयोगी खाद्यपदार्थ (एफएमसीजी) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज महाराष्ट्रातील रांजणगाव येथील फूड पार्कमधील आपल्या प्रस्तावित प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Britannia Industries's Rs 1,000 crore project | ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा १ हजार कोटींचा प्रकल्प

ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा १ हजार कोटींचा प्रकल्प

कोलकाता : नेहमीच्या वापरातील ग्राहकोपयोगी खाद्यपदार्थ (एफएमसीजी) क्षेत्रातील आघाडीची कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज महाराष्ट्रातील रांजणगाव येथील फूड पार्कमधील आपल्या प्रस्तावित प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचा हा सर्वांत मोठा प्रकल्प असणार आहे.
कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वरूण बेरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कंपनी येत्या चार ते पाच वर्षांत रांजणगाव येथील फूड पार्कमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक करील. या प्रकल्पात सुमारे ३ हजार लोकांना रोजगार मिळू शकेल. या प्रकल्पात ६ बिस्किट लाइन्स असतील. याशिवाय रस्क (टोस्ट) आणि क्रॉइसन्ट (खारी व डोनटसारखे खाद्यप्रकार) साठी प्रत्येकी एक लाइन असेल. एक मोठी पिठाची गिरणी आणि एक डेअरी प्रकल्पही असेल. या प्रकल्पासाठी कंपनी चालू आर्थिक वर्षात ४00 कोटी रुपयांचा भांडवली खर्च करील. बेरी यांनी सांगितले की, रांजणगावात ब्रिटानियाची आधीच ९८ एकर जमीन आहे. आणखी ४८ एकर जमीन घेतली जाईल.
बेरी यांनी पुढे म्हटले की, ब्रिटानिया नेपाळमध्ये आपला पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारणार आहे. याशिवाय मुंद्रा आणि गुवाहाटी येथे एकेक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कंपनीची बिस्किट निर्मितीची वार्षिक क्षमता १३ लाख होईल.
तत्पूर्वी, ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे चेअरमन नसली वाडिया यांनी सांगितले की, ग्रीक कंपनी किपितासोबत ब्रिटानिया भागीदारी करणार असून, जून २0१८ पर्यंत फूडपार्कमध्ये संयुक्त प्रकल्प उभा राहील. कंपनीने आपला बाजार हिस्सा प्रतिवर्षी वाढवीत नेला आहे. त्यामुळे कंपनी आज या क्षेत्रात नेतृत्व करीत आहे. यापुढे कंपनीचा मुख्य रोख खर्च कपात आणि नावीन्य याकडे असेल. आपल्या पोर्टफोलिओमधील
ब्रँड अधिक मजबूत करण्यावर कंपनी लक्ष देईल.

जीएसटीचा परिणाम नाही
वाडिया यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे यंदाचे वर्ष अत्यंत कठीण होते. तरीही कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे. जीएसटीचाही कंपनीच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. कंपनी नियमितपणे प्रगती करीत आहे. यापुढेही करीत राहील.

Web Title: Britannia Industries's Rs 1,000 crore project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.