Lokmat Money > बिझनेस न्यूज > धूत ट्रान्समिशनकडून ब्रिटनच्या पार्किन्सन हार्नेसचे अधिग्रहण

धूत ट्रान्समिशनकडून ब्रिटनच्या पार्किन्सन हार्नेसचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:57 AM2018-03-27T03:57:10+5:302018-03-27T03:57:10+5:30

British Parkinson Harness Acquisition by Smooth Transmission | धूत ट्रान्समिशनकडून ब्रिटनच्या पार्किन्सन हार्नेसचे अधिग्रहण

धूत ट्रान्समिशनकडून ब्रिटनच्या पार्किन्सन हार्नेसचे अधिग्रहण

औरंगाबाद : वायरिंग हार्नेसचे उत्पादन करणारी येथील प्रसिद्ध कंपनी धूत ट्रान्समिशनने ब्रिटनच्या पार्किन्सन हार्नेस टेक्नॉलॉजीचे अधिग्रहण केले आहे. या सामंजस्य करारावर रविवारी रात्री लंडनमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.
धूत ट्रान्समिशनने गेल्या एक वर्षात केलेले हे तिसरे धोरणात्मक अधिग्रहण आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१७ मध्ये कंपनीने स्कॉटलँड व स्लोव्हाकियामधील टीएफसी केबल असेंब्लीजचे अधिग्रहण केले होते. याशिवाय अमेरिकेतील कार्लिंग टेकसोबत आॅटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी भागीदारी करार केला होता.
येत्या काही महिन्यांत युरोपातील चौथ्या अधिग्रहणास कंपनीकडून अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते. कंपनीने आपल्या विस्तार योजनेसाठी तब्बल ३२५ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. पार्किन्सनच्या अधिग्रहणाने धूत ट्रान्समिशनच्या उत्पादन सीमांचा विस्तार होणार आहे तसेच वाहनांसाठी असलेली आॅफ रोड उपकरणे, कृषी आणि बांधकाम या क्षेत्रातही कंपनी विस्तारित
होणार आहे.
युरोपीय क्षेत्रात आपले ग्राहक वाढविण्यासाठी धूत ट्रान्समिशनने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. याशिवाय देशपातळीवर चारचाकी वाहने, कृषी आणि बांधकाम क्षेत्रातही कंपनी व्यवसाय वाढवीत आहे.

गेल्या वर्षी धूत ट्रान्समिशनने ८०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यंदा कंपनीचा व्यवसाय १,१०० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. येत्या तीन वर्षांत कंपनीचा व्यवसाय १,७०० कोटींपेक्षा जास्त असेल.

धूत, अर्नशॉ यांनी केल्या स्वाक्षºया
धूत ट्रान्समिशन आणि पार्किन्सन हार्नेस टेक्नॉलॉजी यांच्यात गेल्या ७ महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत आणि पार्किन्सनचे मालक तथा व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड अर्नशॉ यांनी लंडनमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षºया केल्या. धूत ट्रान्समिशनचे सल्लागार सिंघी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Web Title: British Parkinson Harness Acquisition by Smooth Transmission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.