मुंबई : भारतीय इंटरनेट जगत ‘टू-जी’ वरून आता ‘फोर-जी’वर पोहोचले आहे. पण आजही मोबाइल इंटरनेटपेक्षा लॅण्डलाइन ब्रॉडबॅण्डचा वेग भारतात अधिक आहे. ‘ओकला’च्या वेगाची चाचणी करणा-या नव्या जागतिक अहवालात हे तथ्य बाहेर आले आहे.
२०१७च्या सुरुवातीला भारतातील मोबाइल इंटरनेटचा सरासरी वेग ७.६५ मेगा बाईट प्रति सेकंद (एमबीपीएस) होता. तो वेग या वर्षाच्या अखेरीस ८.८० एमबीपीएसवर आला. त्यात १५ टक्के वाढ झाली. मात्र फिक्स्ड लाइन ब्रॉडबॅण्ड इंटरनेट त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगवान असल्याचे या अहवलावातून समोर आले आहे. जानेवारी महिन्यात सरासरी १२.१२ एमबीपीएस असलेला वेग वर्षअखेरीस १८.८२ एमबीपीएसवर गेला. त्यात तब्बल ५० टक्क्यांची वाढ दिसून आली.
सेवा प्रदाता कुठलेही असले तरी वेगात वाढ होत आहे, ही भारतीय इंटरनेट युझर्ससाठी आनंदाची बाब आहे. मात्र भारताला या क्षेत्रात आणखी खूप पुढे जाण्यास वाव आहे. इंटरनेटमध्ये अन्य देश खूप पुढे आहेत. त्यादृष्टीने आता सेवा प्रदाता कंपन्यांनी स्वत:ला तयार करण्याची गरज आहे, असे मत ओकलाचे सह संस्थापक डोग स्युटल्स यांनी यानिमित्ताने व्यक्त
केले.
भारतात इंटरनेटचा सरासरी वेग वाढत असला तरी जगाचा विचार केल्यास भारत खूप मागे आहे. मोबाइल इंटरनेट वेगात भारताचा क्रमांक जगात १०६वा आहे.
>ब्रॉडबॅण्ड इंटरनेटमध्ये भारत ७६व्या स्थानी आहे. मोबाइल इंटरनेट वेगात जगात नॉर्वे सरासरी ६२.६६ एमबीपीएससह पहिल्या स्थानी आहे. सिंगापूर सरासरी
153.85 एमबीपीएससह ब्रॉडबॅण्ड इंटरनेट वेगात जगात अव्वल.
मोबाइलपेक्षा ब्रॉडबॅण्ड इंटरनेट वेगवान, वर्षभरात झाली वाढ
मुंबई : भारतीय इंटरनेट जगत ‘टू-जी’ वरून आता ‘फोर-जी’वर पोहोचले आहे. पण आजही मोबाइल इंटरनेटपेक्षा लॅण्डलाइन ब्रॉडबॅण्डचा वेग भारतात अधिक आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:40 AM2017-12-30T03:40:27+5:302017-12-30T03:40:36+5:30