सध्या वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home) लोकांचा इंटरनेटचा वापर वाढला आहे. अशातच सामान्य मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करून काम करणं थोडं कठीण झालंय. अनेक जण स्वस्त आणि मस्त अशा प्लॅनच्या शोधात असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला सरकारी कंपनी बीएसएनएलच्या ब्रॉडबँड (BSNL Broadband) च्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहे. याची किंमत 299 रुपयांपासून सुरू होती. विशेष म्हणजे यामध्ये हाय स्पीड डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो.
BSNL च्या 299 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 GB डेटा दिला जातो. या डेटासह, तुम्हाला 10 Mbps चा स्पीड दिला जाईल आणि डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 2 Mbps पर्यंत कमी होईल. याशिवाय तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. म्हणजेच, जर तुम्ही दररोज सुमारे 3 GB किंवा थोडा जास्त डेटा वापरत असाल तर हा प्लॅन चांगला होईल.
BSNL 399 Broadband Plan
BSNL च्या 399 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये दुप्पट डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 200 GB डेटाची देण्यात येतो. याशिवाय 10 Mbps चा स्पीड दिला जाईल आणि डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 2 Mbps पर्यंत कमी होईल.तर दुसरीकडे ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
BSNL 555 Broadband Plan
कंपनीच्या 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अधिक डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 1 महिन्यासाठी 500 GB डेटाची मर्यादा मिळते आणि त्यासोबत 10 Mbps स्पीड देण्यात येतो. इतर प्लॅन्सप्रमाणे डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 2 Mbps पर्यंत कमी होतो. याशिवाय तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तुम्ही दररोज 16 GB डेटा खर्च केला तरी हा डेटा कमी पडणार नाही.