Join us

पेटीएमची सवय मोडली? युपीआय सुरु होणार, चार मोठ्या बँकांशी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:16 PM

Paytm new UPI System: पेटीएमने एनपीसीएलकडून परवानगी मिळविली असून ग्राहकांना नवीन पेमेंट सिस्टिम प्रोव्हाडरशी जोडण्यास सुरुवात केली आहे.

आरबीआयने पेटीएम बँकेवर कारवाई केल्याने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवा १५ मार्चपासून बंद झाल्या होत्या. यामुळे युपीआय, फास्टॅग आदी सेवा ग्राहकांना वापरता येत नव्हत्या. याबाबत पेटीएमने आनंदाची बातमी दिली आहे. 

पेटीएमची पॅरेंट कंपनी One 97 Communications Limited (OCL) ने एनपीसीएलकडून परवानगी मिळविली असून ग्राहकांना नवीन पेमेंट सिस्टिम प्रोव्हाडरशी जोडण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी कंपनीने ही माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. पेटीएमने यासाठी एक्सिस, एचडीएफसी, स्टेट बँक आणि येस बँकेसोबत करार केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आता पेटीएमचे ग्राहक या बँकांच्या युपीआयला वळते केले जाणार आहेत. 

यानुसार पेटीएमचे युपीआय आयडीपुढे @paytm असे हँडल जोडले जात होते ते आता @ptsbi, @pthdfc, @ptaxis आणि @ptyes असे मिळणार आहे. ग्राहक ज्या बँकेशी संलग्न आहेत त्या बँकेचे नाव आणि त्यापूर्वी पेटीएमचा पीटी असणार आहे. कंपनीने यासाठी युजर्सना नोटिफिकेशन पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

या सेवा सुरू राहणारपेटीएम वापरकर्ते पेटीएम ॲप वापरू शकतात. या अॅपवरुन क्रेडिट कार्ड बिल भरू शकतात, मोबाईल रिचार्ज करू शकतात किंवा चित्रपटाची तिकिटे बुक करू शकतात. पेटीएम वापरणारे व्यापारी  QR कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीन वापरू शकतात.पेटीएम ॲपवर उपलब्ध असलेल्या विमा सेवा, कार इन्शुरन्स, आरोग्य विमा, नवीन विमा पॉलिसी देखील सुरू राहतील. वापरकर्ते ॲपवर सहजपणे विमा घेऊ शकतात.

टॅग्स :पे-टीएमएसबीआयएचडीएफसी