Share Market Investment : गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात थोडी तेजी दिसून आली होती. असं असलं तरी गुरुवारी कामकाजादरम्यान, त्यात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स पुन्हा एकदा ८० हजारांच्या खाली गेला होता. असं असलं तर ब्रोकरेज काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. तसंच त्यांनी शेअर्स खरेदीचा सल्ला दिला असून टार्गेट प्राईजही वाढवलंय.
इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे यांच्या मते, निफ्टी जर २४,४२० च्या पातळीच्या वर गेला तर त्यात अधिक तेजी येऊ शकते. तर, त्याची सपोर्ट लेव्हल २४,१०० वर आहे.
दरम्यान, आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसेसनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (IREDA) आणि हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायजेस सह गुंतवणूकदारांना पाच प्रमुख शेअर्सची शिफारस केली आहे, जे अल्प आणि दीर्घ मुदतीत चांगला परतावा देतील अशी अपेक्षा आहे.
हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायजेस
हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायजेसला (Healthcare Global Enterprises) ५३० रुपयांचे टार्गेट आणि ४८७ रुपयांच्या स्टॉप लॉससह ५०१.४० रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एचसीजीच्या चार्टवर मोठी रेंज ब्रेकआऊट दिसून आली आहे, ज्यामुळे अपवर्ड ट्रेंड जारी ठेवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.
कॅपॅसिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स
कॅपॅसिटी इन्फ्राप्रोजेक्ट्सला (Capacite Infraprojects) ४५० रुपयांचे टार्गेट आणि ४०५ रुपयांच्या स्टॉप लॉससह ४२०.९५ रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरमध्ये नुकतीच ४.९१ टक्के वाढ झाली असून जोरदार तेजीचा पॅटर्न दिसून येत असून, त्यानंतर तो झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीये.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) ५,१०० ते ५,२०० रुपयांचं टार्गेट ठेवून ४,४८६ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी स्टॉपलॉस ४,२०० रुपये ठेवण्यात आला असून ४,३५० रुपयांवर सपोर्ट मिळू शकतो, ज्यामुळे डिप्सवर खरेदी करण्याची चांगली संधी मिळेल.
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला (IREDA) २३० ते २४० रुपयांचं टार्गेट आणि १८१ रुपयांच्या स्टॉप लॉससह १९८.४० रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इरेडाचा चार्ट घसरत्या ट्रेंडलाइनच्या खाली कन्सोलिडेट करत आहे आणि त्याच्या ब्रेकआऊटसाठी तयार आहे. मजबूत ट्रेडिंग वॉल्यूम आणि २०० रुपयांच्या वर बंद झाल्यानं तो २३० आणि २४० रुपयांच्या टार्गेटकडे जाऊ शकतो असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडला (CDSL) १,९०० ते २,००० रुपयांची टार्गेट प्राईज आणि १,५०० रुपयांच्या स्टॉप लॉससह १,६२२ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सीडीएसएलनं असेंडिंग ट्रायंगलचा पॅटर्न ब्रेक केला. जर तो १,६२५ सस्टेंन क्लोझ झाला तर तो १,९०० ते २,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)