Stocks in Focus : शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. एक दिवस आधी झालेल्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये ३.५ लाख कोटींची वाढ झाली. अमेरिकेच्या लेबर मार्केटची मजबूत आकडेवारी, सकारात्मक जागतिक संकेत, खालच्या पातळीवर खरेदी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पाठिंबा ही या वाढीमागची प्रमुख कारणं आहेत.
यामध्ये एसबीआय, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, शोभा लिमिटेड आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे, ज्याबद्दल ब्रोकरेज कंपन्यांनी आपल्या शिफारशी दिल्या आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे शेअर्स आणि किती आहे टार्गेट प्राईज.
पावर ग्रिड (टार्गेट प्राईज: ३५० रुपये)
ईटी नाऊचे पॅनेलिस्ट नूरेश मेरानी यांनी पॉवर ग्रीडचा शेअर विकत घेण्याचा सल्ला दिलाय. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की या शेअरची टार्गेट प्राइस ३५० रुपये आहे. गुंतवणूकदारांसाठी ३२० रुपयांचा स्टॉपलॉस निश्चित करण्यात आला आहे.
रॅम्को सिमेंट्स (टार्गेट प्राइस: ९७० रुपये)
रॅम्को सिमेंटलाही ९७० रुपयांचं टार्गेट ठेवून खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. स्टॉपलॉस ९०० रुपये निश्चित करण्यात आलाय.
डाबर इंडिया लिमिटेड (टार्गेट प्राइस: ५४० रुपये)
डाबर इंडिया लिमिटेडसाठी ४९० रुपयांच्या स्टॉप लॉससह ५४० रुपयांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. हा शेअर मजबूत वाढीच्या अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकतो.
शोभा लिमिटेड (टार्गेट प्राइस : २१५० रुपये)
इन्व्हेस्टेकनं शोभा लिमिटेडला २१५० रुपयांचे टार्गेट प्राइस देऊन बाय रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले दिलेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये जोरदार मागणी आणि उच्च रिलायझेशनचा कंपनीला फायदा झाला आहे. शिवाय, कंपनी मुंबई/नोएडामध्ये स्ट्रॅटेजिक एन्ट्रीची योजना आखत आहे आणि २-३ वर्षात या बाजारपेठांमध्ये दीर्घकालीन उपस्थिती प्रस्थापित करण्याची कंपनीची योजना आहे.
एचसीएल टेक (टार्गेट प्राइस : १९७० रुपये)
मॉर्गन स्टॅनलीनं एचसीएल टेकसाठी १९७० रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार कंपनीची ऑर्डर बुक स्थिर आहे आणि ते नफ्याच्या वाढीवर लक्ष केंद्रित करीत आहे.
एल अँड टी (टार्गेट प्राइस: ४००० रुपये)
एल अँड टीवर यूबीएसनं ४००० रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील स्पर्धा आणि मध्यपूर्वेत मोठ्या ऑर्डर मिळवण्याच्या क्षमतेमुळे कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे, परंतु असं असूनही कंपनीची स्थिती भक्कम आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज (टार्गेट प्राइस: १४६८ रुपये)
जेपी मॉर्गननं रिलायन्स इंडस्ट्रीजची टार्गेट प्राइस १५६२.५० रुपयांवरून १४६८ रुपये केली आहे. कमकुवत रिफायनिंग मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे आणि रिटेल टॉप-लाइन वाढीच्या संथ गतीमुळे कंपनीच्या कामगिरीवर परिणाम होत आहे, परंतु सोलार पॅनेल प्रकल्पांची सुरुवात नजीकच्या भविष्यात एक सकारात्मक घटक असू शकते.
एसबीआय (टार्गेट प्राइस : १०३० रुपये)
जेफरीजनं एसबीआयसाठी १०३० रुपयांच्या टार्गेट प्राईससह बाय रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार बँकेची मालमत्तेची गुणवत्ता मजबूत आहे आणि एमसीएलआरच्या वाढत्या हिस्स्याचा फायदा होऊ शकतो.
(टीप : यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)