Join us

५० रुपयांच्या शेअरनं केलं मालामाल, १ लाखांचे झाले ६७ लाख; तुम्ही गुंतवलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 5:13 PM

२०२१ मध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक ३९.११ रुपयाला होता तर आता तब्बल २ हजार ६२० रुपयांपर्यंत पोहचला आहे.

मुंबई – शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नेहमी मल्टीबॅगर स्टॉक्सचा शोध असतो. जर तुम्ही गुंतवणूक केलेला शेअर मल्टीबॅगर येतो तर गुंतवणुकदारांची चांदीच होते. परंतु अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी रिस्कची गरज असते. जर कुठल्याही गुंतवणूकदारांनी चांगल्या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्ममधील फेरबदल पाहून घाबरण्याऐवजी काही काळ वाट पाहिली तर निश्चितच त्याचा फायदाही होऊ शकतो.

जास्त काळ गुंतवणुकीत टिकून राहिलं तर त्याचा किती फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला Rajratan Global च्या शेअरचं जबरदस्त उदाहरण आहे. बीएसईवर Rajratan Global च्या शेअरच्या किंमतीचा इतिहासावर नजर टाकली तर हा शेअर २०२१ मध्ये मल्टीबॅगर स्टॉक राहिला आहे. २०२१ मध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक ३९.११ रुपयाला होता तर आता तब्बल २ हजार ६२० रुपयांपर्यंत पोहचला आहे. म्हणजे या कालावधीत या शेअरनं जवळपास ६०० टक्के रिटर्नस दिले आहेत.

एका महिन्यात ३० टक्के रिटर्न

मागील १ महिन्यात Rajratan Global चा शेअर २०२७ रुपयांवरुन वाढून २६२० रुपयांपर्यंत पोहचला आहे. एका महिन्यात या शेअर्सनं कंपनीच्या गुंतवणुकदारांना ३० टक्के रिटर्न दिलेत. मागील ६ महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक २२५२ रुपयांवरुन २६२०.४० पर्यंत पोहचला आहे. १६ टक्क्यांनी या किंमतीत वाढ झाली आहे. मागील १ वर्षात या शेअरनं शेअरहॉल्डर्सना ३७५ टक्के रिटर्न दिलेत. तर मागील ५ वर्षात या शेअरची किंमत २६३.७९ रुपयांवरुन २६२० रुपये इतकी झाली आहे. ५ वर्षात या शेअरनं ९०० टक्के रिटर्न दिलेत. मागील ७ वर्षात Rajratan Global Wire च्या शेअर्समध्ये ६६०० टक्के वाढ होत ३९.११ रुपयांवरुन २६४०.४५ पैसे झाले आहेत.

७ वर्षात जबरदस्त रिटर्न

जर या स्टॉकवर नजर टाकली तर एखाद्या गुंतवणुकदाराने १ महिन्याआधी या स्टॉकमध्ये १ लाख गुंतवणूक केली असेल. तर त्याला १.३० हजार रुपये मिळाले असते. जर कुठल्या गुंतवणुकदाराने ६ महिन्यापूर्वी १ लाख गुंतवले असतील तर १.१६ हजार मिळाले असते तर कुणी १ वर्षापूर्वी गुंतवले असतील तर त्याला ४.७५ लाख रुपये मिळाले असते. याच प्रकारे जर कुणीही या शेअरमध्ये ५ वर्षापूर्वी १ लाख गुंतवले असतील आणि त्याने अद्याप हा शेअर विकला नसेल तर त्याच्या १ लाखाचे आज १० लाख झाले असते आणि कुणी ७ वर्षापूर्वी १ लाख गुंतवले असते तर त्याला आजच्या तारखेला ६७ लाख इतके मिळाले असते.  

टॅग्स :शेअर बाजार