Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market: ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी पैसे मिळणार; लागू होणार T+O सेटलमेंट सिस्टम

Stock Market: ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी पैसे मिळणार; लागू होणार T+O सेटलमेंट सिस्टम

Stock Market T+ 0 Settlement: गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 08:53 AM2024-03-28T08:53:31+5:302024-03-28T08:54:29+5:30

Stock Market T+ 0 Settlement: गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.

BSE T 0 settlement Ambuja Cements Bajaj Auto SBI among 25 stocks that will have new settlement timeline share market sebi new time line | Stock Market: ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी पैसे मिळणार; लागू होणार T+O सेटलमेंट सिस्टम

Stock Market: ज्या दिवशी शेअर्स विकणार, त्याच दिवशी पैसे मिळणार; लागू होणार T+O सेटलमेंट सिस्टम

Stock Market T+ 0 Settlement : गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी पेमेंट सिस्टम गुरुवारपासून म्हणजेच बदलतेय. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या T+0 सेटलमेंट सायकलसाठी बीएसईनं २५ शेअर्सची यादी प्रसिद्ध केली आहे. 

बाजार नियामक सेबीनं या महिन्याच्या सुरुवातीला पर्यायी आधारावर T+0 ट्रेड सेटलमेंट सायकलच्या बीटा व्हर्जनसाठी फ्रेमवर्क सादर केला होता. त्यानंतर आता बीएसईनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलंय. T+0 सेटलमेंट सायकलसाठी पात्र असलेल्या शेअर्समध्ये अंबुजा सिमेंट्स, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा आणि बीपीसीएलसारख्या शेअर्सचा समावेश आहे.
 

T+0 सेटलमेंट सायकल पर्यायी आधारावर एक्सचेंजेसवर लाइव्ह होईल. सध्या ही प्रणाली एक पर्याय म्हणून आणली जात आहे. अशा परिस्थितीत, T+1 सेटलमेंट सुरू राहील. T+0 सेटलमेंटच्या बीटा व्हर्जन नंतर इंस्टंन्ट सेटलमेंट पूर्णपणे लागू होण्यासाठी वेळ लागेल. सेबीच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षी मार्चपर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी होईल. सेबीनं २१ मार्च रोजी T+0 सेटलमेंट सिस्टमच्या बीटा व्हर्जनसाठी फ्रेमवर्क जारी केलं होतं. सध्या भारतीय शेअर बाजार सर्व शेअर्ससाठी T+1 सेटलमेंट सायकलवर काम करतो.
 

काय आहे T+0 सेटलमेंट?
 

शेअर बाजारात शेअर खरेदी करणाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये शेअर्स ट्रान्सफर आणि विकणाऱ्याच्या अकाऊंटमधून जे शेअर विकले जातात, त्याची अमाऊंट ट्रान्सफर म्हणजे सेटलमेंट. T+0 सेटलमेंटमध्ये, शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीचे सेटलमेंट एकाच दिवशी होईल. T+0 सेटलमेंटच्या पहिल्या टप्प्यात त्याच दिवशी सेटलमेंट लागू केलं जाईल, त्यानंतर त्याच दिवशी खरेदीदाराला शेअरचं वाटपही केलं जाईल आणि त्याच दिवशी विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा केले जातील. T+0 स्टॉक्समध्ये ट्रेडिंग सेटमेंट सुट्टीच्या दिवशी होणार नाही.
 

कोणत्या शेअर्समध्ये T+0 सेटलमेंट?

  • अशोक लेलँड लिमिटेड
  • बजाज ऑटो लिमिटेड
  •  बँक ऑफ बडोदा
  •  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  •  बिर्लासॉफ्ट लिमिटेड
  •  सिप्ला लिमिटेड
  •  कोफोर्ज लिमिटेड
  •  दिविज लेबोरेटरीज लिमिटेड
  •  हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
  •  इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड
  •  जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड
  •  एलआयसी हाउसिंग फाइनान्स लिमिटेड
  •  एलटीआय माइंडट्री लिमिटेड
  •  एमआरएफ लिमिटेड
  •  नेस्ले इंडिया लिमिटेड
  •  एनएमडीसी लिमिटेड
  •  ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
  •  पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड
  •  संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड
  •  भारतीय स्टेट बँक
  •  टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड
  •  ट्रेंट लिमिटेड
  •  युनियन बँक ऑफ इंडिया
  •  वेदांता लिमिटेड

Web Title: BSE T 0 settlement Ambuja Cements Bajaj Auto SBI among 25 stocks that will have new settlement timeline share market sebi new time line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.