फटो आहे.. रॅपमध्ये ...कॅप्शन : ग्राहक व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सिबीचेन के. मॅथ्यू. सेवेबाबत ग्राहकांनी दक्ष असावे- मॅथ्यू यांचे आवाहन : ट्रायतर्फे ग्राहक जागरूकता कार्यक्रमनागपूर : कंपन्यांकडून मिळणाऱ्या आवश्यक सेवेसंदर्भात ग्राहकांनी दक्ष असावे, असे आवाहन टेलिकॉम रेग्युलेटरी ॲॅथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे सल्लागार प्रमुख डॉ. सिबीचेन के. मॅथ्यू यांनी येथेे केले.ट्रायच्या बेंगळुरू कार्यालयातर्फे अधिकारांची माहिती नागरिकांना देण्यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी ग्राहक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. मॅथ्यू यांनी क्षेत्रीय कार्यालयाची भूमिका, कार्यपद्धती तसेच दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंदर्भात आतापर्यंत घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. दूरध्वनीसंबंधित मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्यधारित सेवा, तक्रार नोंद कार्यपद्धती, टेरिफ आदींबद्दल ट्रायच्या नियमांवर प्रकाश टाकण्यात आला.सेवेसाठी दक्षता केंद्राशी संपर्क साधामॅथ्यू म्हणाले की, कोणत्याही तक्रारी अथवा सेवा, विनंती संदर्भात सेवा घेणाऱ्या व्यक्तीला ग्राहक दक्षता केंद्रांशी संपर्क करावा लागतो. तक्रार नोंदवून त्या तक्रारीची विस्तारित माहिती जसे तक्रार क्रमांक, दिनांक, वेळ तक्रार निवारण्यासाठी लागणारा वेळ ही माहिती एसएमएसद्वारे ग्राहकाला दिली जाते. जर ग्राहक तक्रार निवारणाबाबत समाधानी नसेल तर तो उच्च अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतो. त्यासाठी ग्राहक डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट टीसीसीएमएस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करू शकतात. या संकेतस्थळावर ग्राहक दक्षता केंद्र, सर्वसाधारण माहिती, तक्रार केंद्र, उच्च अधिकारी सर्वांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकाला त्याच दूरध्वनी क्रमांकावर सेवा पुरविणारी कंपनी बदलायची झाल्यास ग्राहक पोर्ट (१० आकडी मोबाईल क्रमांक) हा एसएमएस १९०० या क्रमांकावर पाठवू शकतो. यासाठी यूपीसी कोडची मुदत ही १५ दिवसांसाठी राहील, असे मॅथ्यू यांनी स्पष्ट केले. कंपनी ग्राहकांना खात्री करूनच मूल्यवर्धित सेवा पुरविते. शिवाय ग्राहकाला नको असलेली सेवा सुरू झाल्यास ती बंद करण्यासाठी मोफत क्रमांकाची सुविधा कंपनीने ठेवणे बंधनकारक आहे. अनावश्यक व नको असलेली व्यावसायिक जाहिरात संदेश बंद करण्यासाठी ग्राहक एसएमएस किंवा फोन करू शकतो.
बीएसएनल ...१ ...
फोटो आहे.. रॅपमध्ये ...
By admin | Published: January 23, 2015 01:03 AM2015-01-23T01:03:48+5:302015-01-23T01:03:48+5:30