Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, ४ हजार कोटी तिजोरीत जमा होणार

BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, ४ हजार कोटी तिजोरीत जमा होणार

एकीकडे देशातील रिलायन्स, जिओ, एअरटेलसह खासगी दूरसंचार ऑपरेटर ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे देशातील सरकारी दूरसंचार ऑपरेटर बीएसएनएल अद्याप ग्राहकांना ४जी सेवाही देऊ शकलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:44 AM2022-08-27T11:44:05+5:302022-08-27T11:44:29+5:30

एकीकडे देशातील रिलायन्स, जिओ, एअरटेलसह खासगी दूरसंचार ऑपरेटर ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे देशातील सरकारी दूरसंचार ऑपरेटर बीएसएनएल अद्याप ग्राहकांना ४जी सेवाही देऊ शकलेली नाही.

BSNL 13 thousand mobile towers for sale 4 thousand crores will be collected in the treasury | BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, ४ हजार कोटी तिजोरीत जमा होणार

BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, ४ हजार कोटी तिजोरीत जमा होणार

नवी दिल्ली: 

एकीकडे देशातील रिलायन्स, जिओ, एअरटेलसह खासगी दूरसंचार ऑपरेटर ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे देशातील सरकारी दूरसंचार ऑपरेटर बीएसएनएल अद्याप ग्राहकांना ४जी सेवाही देऊ शकलेली नाही. त्यातच आता केंद्र सरकार २०२५पर्यंत बीएसएनएलचे तब्बल १३,५६७ मोबाईल टॉवर विकण्यास काढले आहेत. त्यामुळे सरकारला ४ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

देशात ५जी सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून ५जीसाठी यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे. असे असताना बीएसएनएलचे टॉवर विकण्याच्या वृत्तामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

अहवालानुसार, बीएसएनएल आणि एमटीएनएल टॉवरच्या विक्रीसाठी केपीएमजीला सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. यानंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने बीएसएनएलचे टॉवर विकणार आहे.

नीट काम करा, नाही तर  घरी बसा : केंद्रीय मंत्री
बीएसएनएलला आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने १.६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज होते. त्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ६२ हजार कर्मचायांना सूचना केल्या होत्या. कर्मचायांनी सरकारी वृत्ती सोडून कर्मचायांना नीट काम करण्यास त्यांनी सांगितले. यासोबतच सरकारीवृत्ती सोडा आणि नीट काम करा, नाही तर घरी बसा, असेही त्यांनी म्हटले आहे.

बीएसएनएलचे देशभरात किती टॉवर ?
दिल्ली, मुंबईवगळता देशाच्या कानाकोपयात बीएसएनएलचे एकूण ६८ हजार मोबाईल टॉवर आहेत, त्यापैकी ७० टक्के टॉवर फायबर केबलने जोडलेले आहेत. फायबर केबलने जोडलेले हे टॉवर ४जी आणि ५जी सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. असे असताना आता टॉवर विक्रीला काढण्यात आले आहेत.

Web Title: BSNL 13 thousand mobile towers for sale 4 thousand crores will be collected in the treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.