Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...

BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...

BSNL : बीएसएनएल स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे प्लॅन ऑफर करून अधिक लोकांना आकर्षित करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:22 PM2024-11-11T12:22:28+5:302024-11-11T12:23:31+5:30

BSNL : बीएसएनएल स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे प्लॅन ऑफर करून अधिक लोकांना आकर्षित करत आहे.

bsnl 130 day recharge plan big challenge for jio airtel vi check benefits | BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...

BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...

नवी दिल्ली : पुढील वर्षी जूनपर्यंत संपूर्ण देशात बीएसएनएल (BSNL) आपले 4G नेटवर्क सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने 50,000 नवीन टॉवर्स बसवले आहेत. याशिवाय, बीएसएनएल 5G नेटवर्क सुरू करण्याच्या तयारीत आहे. यातच गेल्या काही महिन्यात इतर मोबाईल कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत, त्यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे धाव घेतली आहे. केवळ जुलै-ऑगस्टमध्ये 55 लाख नवीन लोक बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत. बीएसएनएल स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे प्लॅन ऑफर करून अधिक लोकांना आकर्षित करत आहे.

BSNL चा 130 दिवसांचा प्लॅन
बीएसएनएलचा 130 दिवसांचा प्लॅन आहे, ज्याची किंमत 700 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळत आहे. हा प्लॅन 699 रुपयांचा आहे आणि 130 दिवसांसाठी आहे. यामध्ये, संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही आणि रोमिंगसाठीही कोणतेही शुल्क लागणार नाही. तुम्हाला दररोज 0.5GB डेटा आणि 100 SMS मोफत मिळतील. शिवाय, तुम्हाला एक मोफत रिंगटोन देखील मिळेल.

BSNL चा 150 दिवसांचा प्लॅन
बीएसएनएलचा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे, जो 150 दिवस चालतो. या प्लॅनची किंमत फक्त 397 रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा देखील मिळत आहे. पहिले 30 दिवस तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 2GB डेटा देखील मिळेल. ज्यांना दुसरा क्रमांक म्हणून सिम कार्ड घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे.

5G साठी BSNL ची तयारी 
बीएसएनएल लवकरच 5G नेटवर्क लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने दिल्लीत 5G सेवा सुरू करण्यासाठी निविदा जारी केली आहे. बीएसएनएलला 1876 ठिकाणी 5G नेटवर्क बसवायचे आहे. हे काम भारतीय कंपन्याद्वारे केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख लोकांना 5G सेवा मिळणार आहे. तसेच, बीएसएनएल घरांमध्ये जलद इंटरनेट देण्याची तयारी करत आहे.

Web Title: bsnl 130 day recharge plan big challenge for jio airtel vi check benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.