सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी काही नवनवीन प्लॅन आणत असते. अनेक युझर्सचा स्वस्तात अनेक बेनिफिट्स मिळण्याकडे असतो. बीसएनएलनं एक ४८५ रूपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये मोठी व्हॅलिडिटी, दररोजचा डेटा आमि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसारख्या सुविधा देण्यात येत आहेत.४८५ रूपयांचा हा एक कॉम्बो प्लॅन आहे. यामध्ये ९० दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज १.५ जीबी डेटा म्हणजेच ९० दिवसांसाठी १३५ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यासह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. या प्लॅनसोबत कोणतीही फेअर युसेज पॉलिसीही लागू होत नाही. याशिवाय या प्लॅसोबत ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. एअरटेल, जिओला टक्करबीएसएनएलचा हा प्लॅन एअरटेलच्या ५९८ आणि रिलायन्स जिओच्या ५५५ रूपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. एअरटेलच्या ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तर यासोबत कंपनी ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटाही देते. याव्यतिरिक्त कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलचाही लाभ ग्राहकांना मिळतो. रिलायन्स जिओच्या ५५ रूपयांच्या प्लॅनमध्येदेखील हेच बेनफिट्स देण्यात येतात. याव्यतिरिक्त युझर्सना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
BSNL : १३५ जीबी डेटा, ९० दिवस मोफत कॉलिंग, पाहा ५०० रूपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन
By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 6:20 PM
पाहा काय मिळणार बेनिफिट्स
ठळक मुद्देएअरटेल, जिओला हा प्लॅन देणार टक्कर