रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel), आणि व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) सह सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी आपले रिचार्ज प्लॅन्स महाग केले होते. परंतु सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं (BSNL) मात्र आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत कोणतेही बदल केले नव्हते. बीएसएनएलकडे असे काही प्लॅन्स आहेत, जे या तिन्ही खासगी कंपन्यांच्याकडे नाहीत. आज आम्ही तुम्हाला असा एक प्लॅन सांगणार आहोत ज्यामध्ये २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १५० दिवसांची वैधता मिळेल.
बीएसएनएलचा १९७ रुपयांचा दीर्घ वैधता असलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १५० दिवसांची वैधता मिळत आहे. यासोबतच ग्राहकांना डेटा, कॉलिंगआणि एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना देण्यात येणआरी बेनिफिट्स हे केवळ सुरुवातीच्या काही दिवासांसाठीच मिळणार आहेत. हे प्लॅन दररोज ग्राहकांना २ जीबी डेटासोबत सर्व नेटवर्कवर अनिलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहेत.
डेटा लिमिट संपल्यानंतर ४० kbps करण्यात येतो. यामध्ये रोज १०० जीबी डेटा आणि Zing अॅपचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं. या सेवा सुरूवातीच्या केवळ १८ दिवसांसाठी देण्यात येतात. एकदा बेनिफिट्स संपल्यानंतर युझर्सना इंटरनेट, कॉलिंग सुविधा सुरू ठेवणअयासाठी टॉप अप प्लॅन आणि व्हाऊचर निवडू शकतात. तर दुसरीकडे १८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह युझर्स कोणत्याही टॉप अप शिवाय आपला बीएसएनएल क्रमांक सुरूही ठेवू शकतात.