बीएसएनएल ...२ ...
By admin | Published: January 23, 2015 1:05 AM
टेरिफ प्लॅन सहा महिने बंधनकारकदूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपनांना आपला टेरिफ प्लॅन दोन प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आणणे बंधनकारक आहे. यातील एक वर्तमानपत्र इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषेचा असावा. एखादा नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणे बंधनकारक आहे. फोन सेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रीपेड सेवेत ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करू शकत नाही. ग्राहकाच्या फोन खात्याात कमीत कमी २० किंवा त्यातून अधिक जमा असल्यास ही सेवा बंद करता येणार नाही. मोबाईल डिस्कनेक्ट झाल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांचा अधिक कालावधी देण्यात यावा. दूरध्वनी सेवेप्रमाणेच केबल टीव्ही नेटवर्कच्या डिजिटलायझेशन संदर्भात माहिती देण्यात आली. केबल ऑपरेटर्सकडे सेवेसंदर्भात तक्रार निवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे. यावेळी कन्झ्युमर्स हॅण्डबुकचे उपस्थितांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमात बेंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर, अधिकारी, संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य, स्वयंसेवा संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.