बीएसएनएलची (BSNL) डीएसएल (DSL) ब्रॉडबँड सेवा 299 रुपयांचा प्लॅन देत आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 100 GB डेटा मिळतो. दरम्यान, या प्लॅनचा स्पीड फक्त 10Mpbs आहे, जो खूप कमी आहे. डेटा संपल्यानंतर स्पीड 2Mbps वर येतो. विशेष म्हणजे ब्रॉडबँड प्लॅन केवळ नवीन युजर्ससाठी सहा महिन्यांसाठी उपलब्ध आहे, त्यानंतर युजर्संना 200 GB CUL प्लॅनमध्ये शिफ्ट केले जाईल, ज्याची किंमत 399 रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा प्लॅन 200 जीबी डेटा प्रदान करतो, ज्याची स्पीड फक्त 10Mbps आहे. (bsnl 299 rupees dsl service broadband plan gives 100gb data know speed and plan detail calling benefits)
कंपनीचे इतरही अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात 555 रुपये, 779 रुपये, 949 रुपये आणि 1,299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हे सर्व ब्रॉडबँड प्लॅन अनुक्रमे 500GB, 779GB, 1100GB आणि 1600GB डेटासह 10Mbps स्पीड देतात. आपल्या माहितीसाठी, डिजिटल सबस्क्राइबर लाइन (DSL) सार्वजनिक स्विच केलेल्या टेलिफोन नेटवर्कवर सेवा प्रदान करते.
PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करताय? मग, जाणून घ्या काही खास माहिती... https://t.co/FwaOiQuExE#business
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2021
Airtel चा बेसिक प्लॅन 499 रुपयांत
एअरटेलबद्दल बोलायचे झाले तर याच्या एक्सस्ट्रीम फायबर बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. यामध्ये युजर्सला 40Mbps पर्यंतच्या स्पीडसह अमर्यादित इंटरनेट दिले जाते. हा प्लॅन एअरटेल एक्सस्ट्रीम, विंक म्युझिक, शॉ अकादमी, वूट बेसिक सबस्क्रिप्शन, इरोस नाऊ, हंगामा प्ले, शेमारू एम आणि अल्ट्रासह इतर फायद्यांसह मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
टाटा स्कायचा बेसिक ब्रॉडबँड प्लॅन
टाटा स्कायच्या बेसिक ब्रॉडबँड प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 649 रुपये आहे, जी 50Mbps च्या स्पीडसह येते. ही एक मासिक योजना आहे, ज्यात लँडलाईन कनेक्शन आवश्यक नाही. या ब्रॉडबँड प्लॅनसह युजर्सला अनलिमिटेड इंटरनेट मिळते.