Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ रिचार्ज प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ रिचार्ज प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग

ही दूरसंचार कंपनी सध्या १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:35 PM2022-07-05T19:35:02+5:302022-07-05T19:35:13+5:30

ही दूरसंचार कंपनी सध्या १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे.

bsnl 3 free recharge plan under 100 rupees offer up to 2gb daily data unlimited calling | १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ रिचार्ज प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ रिचार्ज प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग

100 रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा आणि कॉलिंग. ही किंमत तुम्हाला खरी वाटणार नाही, परंतु खरोखरच असे काही प्लॅन्स अस्तित्वात आहेत. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL कडे 100 रूपयांपेक्षा कमी किंमतीचे तीन उत्तम प्रीपेड प्लॅन्स आहेत. येथे आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या या तिन्ही प्लॅनची माहिती देणार आहोत. पाहूया कोणते आहेत हे प्लॅन्स.

हा कंपनीच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनपैकी एक आहे. 87 रुपयांच्या रिचार्जमध्ये 14 दिवसांची वैधता देण्यात येत आहे. प्लॅनमध्ये, अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 1 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय दिवसाला 100 एसएमएस आणि गेम्सचीही सुविधा देण्यात येत आहे.

10 रुपये अतिरिक्त देऊन म्हणजेच 97 रूपयांत तुम्ही अधिक डेटा आणि वैधता मिळवू शकता. बीएसएनएलचा हा प्लॅन 18 दिवसांचा आहे. प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय लोकधुन कॉन्टेन्टचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

97 रुपयांच्या प्लॅन्सप्रमाणे 99 रूपयांचा प्लॅन देखील 18 दिवसांच्या वैधतेसह येतो. रिचार्ज तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह तुमच्या आवडीची कॉलर ट्यून सेट करण्याचीही सुविधा देतो. यामध्ये डेटा आणि एसएमएस देण्यात आलेला नाही.

Web Title: bsnl 3 free recharge plan under 100 rupees offer up to 2gb daily data unlimited calling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.