Join us

BSNL वापरकर्त्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने 4G आणि 5G बाबत दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:06 AM

देशात 5G सेवा सुरू होऊन काही महिने झाले. जिओ, एअरटेल या कंपन्यांनी ही सेवा देशभरात सुरू केली आहे. आता ...

देशात 5G सेवा सुरू होऊन काही महिने झाले. जिओ, एअरटेल या कंपन्यांनी ही सेवा देशभरात सुरू केली आहे. आता बीएसएनलही 5G सेवा सुरू करणार आहे. या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत BSNL ने 4G सुरू केले नव्हते, पण आता कंपनी 4G आणि 5G सेवा सुरू करणार आहे. केंद्रीय आयटी आणि कम्युनिकेशन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली.

अश्विनी वैष्णव म्हणाले,'बीएसएनएलने २०० साइट्सवर 4G नेटवर्क सुरू केले आहे. 4G नेटवर्क फक्त २०० साइट्सवर सुरू करण्यात आले आहे, पण केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, तीन महिन्यांसाठी चाचणी केली जाईल, जर सर्व काही ठीक झाले तर दररोज सरासरी २०० साइट सुरू केल्या जातील.

5G बाबत काय अपडेट?

BSNL ने 4G आणण्यास सुरुवात केली आहे, पण तरीही ते Airtel आणि Jio च्या मागे आहे.  कंपनीने 5G वर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. सरकारने 5G बाबत अपडेट देखील दिले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत 4G सुरू होईल, नंतर, 4G नेटवर्क 5G वर अपग्रेड केले जाईल. असंही अश्विनी वैष्णव म्हणाले.

वैष्णव म्हणाले, "बीएसएनएल ज्या वेगाने सुरू करेल, तीन महिन्यांच्या चाचणीनंतर, आम्ही दररोज २०० साइटवर काम करणार आहोत. ही सरासरी आहे की आम्ही पुढे जात आहोत. याप्रमाणे काम करू, पण नंतर लवकरच नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास, अगदी लहान सॉफ्टवेअर ऍडजस्टमेंटसह, ते 5G होईल.

"आज व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक मिनिटाला एक 5G साइट सक्रिय केली जात आहे. यामुळे जग आश्चर्यचकित झाले आहे. चारधाम येथे २,००,००० वी साइट स्थापन करण्यात आली आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू केली. पहिल्या १ लाख 5G साइट्स सेवा सुरू झाल्यापासून ५ महिन्यांत सुरू झाल्या. जिओ आणि एअरटेलचा संबंध आहे. दोन्ही कंपन्या बीएसएनएलच्या खूप पुढे आहेत. दोन्ही कंपन्यांनी 5G सह देशातील जवळजवळ प्रत्येक भाग कव्हर केला आहे.

टॅग्स :बीएसएनएल५जी