Join us

₹98 मध्ये दररोज 2GB डेटा, 'या' दोन रिचार्ज प्लॅन्ससमोर Jio-Airtel फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 4:14 PM

पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स...

रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलकडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. खाजगी दूरसंचार कंपन्यांप्रमाणे, BSNL देखील त्यांच्या काही रिचार्ज प्लॅन्ससह OTT बेनिफिट्स ऑफर करते. आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा दोन प्लॅनबद्दल सांगत आहोत. BSNL च्या या 2 प्लॅनची ​​किंमत 98 रुपये आणि 447 रुपये आहे.

बीएसएनएलच्या 98 रुपयांसारखा प्लॅन आणखी कोणत्याही कंपनीकडे नाही. या प्लॅनची वैधता 22 दिवसांची असून यामध्ये रोज 2 जीबी डेटा ऑफर केला जातो. यानुसार या प्लॅनमध्य ग्राहकांना एकूण 44 जीबी डेटा देण्यात येतो. ओटीटी बेनिफिट्सच्या रुपात कंपनी Eros Now Entertainment चं सबस्क्रिप्शन देत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे केवळ एक डेटा व्हाऊचर आहे. यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा डेटा बेनिफिट्स दिले जात नाहीत.

कंपनीचं दुसरं व्हाऊचर 447 रुपयांचं आहे. यामध्ये एकूण 100 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच डेली लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80 केबीपीएस इतका करण्यात येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात. यामध्येही कंपनी आपल्या ग्राहकांना Eros Now Entertainment चं सबस्क्रिप्शन आणि बीएसएनएल ट्युन्सचं अॅक्सेस देते.

टॅग्स :बीएसएनएलएअरटेलरिलायन्स जिओ