व्होडाफोनआयडिया (Vodafone-Idea) आणि बीएसएनएल (BSNL) मधून मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओमध्ये (Reliance Jio) पोर्ट केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय दूरसंचार प्राधिकरण ट्राय (TRAI) आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये एकूण 1.128 कोटी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) विनंती करण्यात आली. देशभरातील 1.128 कोटी एमएनपी विनंत्यांपैकी 64.9 लाख विनंत्या झोन -1 मधून आल्या, तर 479 दशलक्ष विनंत्या झोन -2 मधून आल्या. यामुळे जुलै 2021 च्या अखेरीस भारतातील एकूण MNP विनंती 61.687 कोटींवरून ऑगस्ट 2021 च्या शेवटी 62.815 कोटींवर गेली.
पोर्ट करण्यात महाराष्ट्र आघाडीवरट्रायच्या आकडेवारीनुसार, झोन -1 मध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक (5.176 कोटी) एमएनपी विनंत्या करण्यात आल्या आहेत, त्यानंतर राजस्थानचा (4.553 कोटी) क्रमांक आहे. तर याच्या तुलनेत झोन 2 मध्ये कर्नाटकात (5.013 कोटी) आतापर्यंत सर्वाधिक MNP विनंती करण्यात आल्या. तर त्यानंतर आंध्र प्रदेशाचा (4.823 कोटी) क्रमांक आहे.
व्होडाफोन-आयडिया, बीएसएनएलनं गमावले ग्राहकजिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांनी पोर्ट आउट केले असले तरी हे स्पष्टपणे दिसून येते की व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या संख्येने पोर्ट आऊट करत आहेत. या कालावधीत व्होडाफोन आयडियाने 8,33,549 ग्राहक गमावले, तर बीएसएनएलला 60,439 ग्राहकांनी रामराम ठोकला. दरम्यान, कोणत्याही टेलिकॉम कंपनीने काही वेळात नवीन ग्राहक जोडले नाहीत.
एअरटेल जिओकडे ग्राहकांचा ओघदरम्यान, संख्येचा उल्लेख करण्यात आला नसला तरी मोठ्या प्रमाणात व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांनी रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या क्रमांकावर पोर्ट केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नेटवर्कची उपलब्धता हे याचं कारण असू शकतं. परंतु नेटवर्कच्या बाबतीत व्होडाफोन आयडिया, एअरटेल हे जिओच्या मागेच आहेत.