Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL चा ढासू Plan! कमी किमतीत 60 दिवसांपर्यंत 100GB डेटा व बरेच काही...

BSNL चा ढासू Plan! कमी किमतीत 60 दिवसांपर्यंत 100GB डेटा व बरेच काही...

bsnl best recharge plan : आज आम्ही बीएसएनएलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीत 100GB इंटरनेट आणि इतर अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 02:10 PM2022-02-14T14:10:42+5:302022-02-14T15:25:08+5:30

bsnl best recharge plan : आज आम्ही बीएसएनएलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीत 100GB इंटरनेट आणि इतर अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत.

bsnl best recharge plan worth rs 447 get 100gb data without daily limit ott subscription and other benefits | BSNL चा ढासू Plan! कमी किमतीत 60 दिवसांपर्यंत 100GB डेटा व बरेच काही...

BSNL चा ढासू Plan! कमी किमतीत 60 दिवसांपर्यंत 100GB डेटा व बरेच काही...

नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना असे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे कमी किमतीत अधिक बेनिफिट्स देऊ शकतात. मग, त्या जिओ (Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) किंवा एअरटेल (Airtel) यासारख्या खाजगी कंपन्या असोत किंवा बीएसएनएल ( BSNL) सारख्या सरकारी कंपन्या असोत. दरम्यान, आज आम्ही बीएसएनएलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीत 100GB इंटरनेट आणि इतर अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत.

आज आम्ही बीएसएनएलच्या (BSNL) अशा प्लॅनबद्दल सांगत आहोत जो डेली लिमिटशिवाय हाय स्पीड डेटा आणि 500 ​​रुपयांपेक्षा कमी OTT सबस्क्रिप्शनसह अनेक फायदे देत आहे. या प्लॅनची ​​किंमत 447 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेटा आणि व्हॉईस कॉलिंगपासून OTT सबस्क्रिप्शनपर्यंत सर्व प्रकारचे बेनिफिट्स दिले जात आहेत. दरम्यान, बीएसएनएलचा हा प्लॅन खूपच स्वस्त आहे आणि त्याची व्हॅलिडिटी दोन महिने म्हणजेच 60 दिवस आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊया...

60 दिवसांसाठी 100GB इंटरनेट
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 60 दिवसांसाठी एकूण 100GB हायस्पीड इंटरनेट दिले जात आहे. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या डेटावर कोणतीही दैनिक मर्यादा (डेली लिमिट) घालण्यात आलेली नाही, म्हणजेच तुम्ही एका दिवसात तुम्हाला हवे तितके इंटरनेट वापरू शकता. मात्र, 100GB इंटरनेट संपल्यानंतर तुमचा डेटा स्पीड 80Kbps इतका कमी होईल.

या प्लॅनमधील इतर बेनिफिट्स
या प्लॅनच्या इतर बेनिफिट्सबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस (SMS) मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला Eros Now चे सबस्क्रिप्शन आणि BSNL Tunes चे एक्सेस देखील मिळेल.

Web Title: bsnl best recharge plan worth rs 447 get 100gb data without daily limit ott subscription and other benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.