Join us

BSNL युझर्सना खुश करतोय हा प्लान; दीर्घ व्हॅलिडिटीसह मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स, काय आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:46 IST

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये ओळखली जाते.

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये ओळखली जाते. बीएसएनएल आपल्या युजर्सला इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूप स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. यामुळेच अनेक जण आपला नंबर बीएसएनएलवर पोर्ट करत आहेत.

बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणि ऑफर्स देत असते. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या एका रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, जो युजर्सला खूप आवडतो. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लान १५० दिवसांच्या वैधतेसह येतो. अशावेळी तुम्हाला पुन्हा बराच काळ रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. बीएसएनएलचा हा नवा प्लान तुम्ही फक्त ३९७ रुपयांत खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी.

बीएसएनएलचा ३९७ रुपयांचा प्रीपेड प्लान

बीएसएनएलचा हा प्लान १५० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला पूर्ण ५ महिन्यांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला पहिल्या ३० दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळणार आहे. तसेच दररोज २ जीबी डेटाचा ही लाभ मिळणार आहे. मात्र, उर्वरित वैधतेसाठी तुम्हाला कोणतेही बेनिफिट्स मिळणार नाहीत. पण तुमचं सिम अॅक्टिव्ह राहील. बीएसएनएलचा हा प्लान अशा युजर्ससाठी बेस्ट आहे ज्यांना आपलं सेकंडरी सिम जास्त काळ अॅक्टिव्ह ठेवायचं आहे.

टॅग्स :बीएसएनएल