BSNL Diwali Offer: काही दिवसांपूर्वीच टाटा समूहाने बीएसएनएलशी हातमिळवणी केली आहे. तेव्हापासून सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला सुगीचे दिवस सुरू झाले आहे. बीएसएनएल सध्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आहे. अलीकडेच बीएसएनएलने आपला लोगो आणि घोषवाक्यही लाँच केले. कंपनीने आपल्या ७ नवीन सेवा देखील सुरू केल्या आहेत. जुलैमध्ये सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती भरमसाठी पद्धतीने वाढवल्या. त्यानंतर सुमारे ५५ लाख नवीन वापरकर्ते बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत. BSNL लवकरच देशभरात आपली 4G सेवा सुरू करणार आहे. दरम्यान, बीएसएनएलने दिवाळीनिमित्त चांगली ऑफर आणली आहे.
BSNL ची दिवाळी ऑफर
दिवाळीनिमित्त बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. BSNL आपल्या फायबर ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी ५०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल विनामूल्य ऑफर करत आहे. BSNL ने गेल्या काही दिवसांत देशातील पहिला IFTV (Internet Fiber Television) लॉन्च केला आहे, ज्यामध्ये युजर्स त्यांच्या आवडीचे लाईव्ह आणि प्रीमियम पे-टीव्ही चॅनेल निवडू शकतात. BSNL फायबर ब्रॉडबँड योजना ग्रामीण भागात २४९ रुपये प्रति महिना आणि शहरी भागात ३२९ रुपये प्रति महिना पासून सुरू होतो. BSNL ने आपल्या X हँडलवर याची माहिती दिली आहे पोस्ट केले आहे की प्रत्येक BSNL भारत फायबर वापरकर्त्याला IFTV वर मोफत प्रवेश दिला जाईल.
बीएसएनएलची युजर्सला आणखी एक गोड बातमी
दिवाळीच्या मुहूर्तावर बीएसएनएलने आपल्या १ वर्षाच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत कमी केली आहे. BSNL आपला १९९९ रुपयांचा वार्षित प्लान आता फक्त १८९९ रुपयांना देत आहे. ही ऑफर फक्त ७ नोव्हेंबरपर्यंत वैध आहे. BSNL च्या या १८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला १ वर्षाच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग, ६०० GB डेटा आणि १०० मोफत एसएमएस दररोज दिले जाणार आहेत.