Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे

आपल्या विविध मागण्यांसाठी बीएसएनएलच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पुकारलेला सोमवारचा पूर्वनियोजित संप पुढे ढकलला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:29 AM2018-12-04T05:29:43+5:302018-12-04T05:29:54+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी बीएसएनएलच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पुकारलेला सोमवारचा पूर्वनियोजित संप पुढे ढकलला आहे.

BSNL employees' strike ends 10th December | बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा संप १0 डिसेंबरपर्यंत पुढे

नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी बीएसएनएलच्या सर्व कर्मचारी संघटनांनी पुकारलेला सोमवारचा पूर्वनियोजित संप पुढे ढकलला आहे. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांच्यासोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास १0 डिसेंबर रोजी हा संप होईल, असे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांची भेट घेतली. त्यानंतर, संप पुढे ढकलण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, संघटनांनी केलेल्या मागण्यांपैकी काही मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे. ४ जी स्पेक्ट्रम विरतण, निवृत्तीवेतन आढावा व निवृत्ती वेतनातील बीएसएनएलचे योगदान या बाबींचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर संप पुढे ढकलण्यात आला आहे.
आॅल युनियन्स अँड असोसिएशन्स आॅफ बीएसएनएल (एयूएबी) या शिखर संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिसऱ्या वेतन आढाव्याशी संबंधित आमच्या मागणीबाबत सचिवांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी नाही. दूरसंचार राज्यमंत्र्यांसोबत चर्चेची एक संधी मिळावी, यासाठी एयूएबीने आपला संप एक आठवडा पुढे ढकलला आहे.
कर्मचारी संघटनांनी सरकारी मालकीच्या कंपनीस ४ जी स्पेक्ट्रम देण्याची मागणी केली आहे. याशिवाय कंपनी स्पर्धेत टिकू शकणार नाही, असे संघटनांचे म्हणणे आहे. त्यांनी दुसºया व तिसºया सुधारणा समितीच्या शिफारशींप्रमाणे वेतनात सुधारणांची मागणीही केली आहे.

Web Title: BSNL employees' strike ends 10th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.