Join us  

बीएसएनएलचा २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा

By admin | Published: April 05, 2017 4:21 AM

इंटरनेटच्या प्राइस वॉरमध्ये आता बीएसएनएलने उडी मारली असून, कंपनीने २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देण्याचे जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : इंटरनेटच्या प्राइस वॉरमध्ये आता बीएसएनएलने उडी मारली असून, कंपनीने २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देण्याचे जाहीर केले आहे. जिओसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे. या योजनेनुसार ग्राहकाला दररोज १० जीबी डेटा वापरता येणार आहे. म्हणजेच महिन्याला ३०० जीबी डेटा वापरता येईल. याशिवाय रात्री ९ ते सकाळी ७ या काळात सर्व नेटवर्कसाठी मोफत कॉल करता येणार आहेत. यासाठी काही अतिरिक्त शुल्क असेल. बीएसएनएल अशी एकमेव कंपनी आहे जी वायर लाईन ब्रॉडबँड सेवा देते. बीएसएनएल बोर्डाचे संचालक एन.के. गुप्ता यांनी ही माहिती दिली.