Join us

BSNLनं आणला कॉलिंग, SMS चा रिचार्ज प्लान; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:49 IST

BSNL Recharge Plan : भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनेही आपला एकमेव कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान सादर केलाय. ट्रा

BSNL Recharge Plan : भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनेही आपला एकमेव कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान सादर केलाय. ट्रायनं नुकताच सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान आणण्याचे आदेश दिले होते. डेटा न वापरणाऱ्या युजर्सना स्वस्त रिचार्ज प्लानचा फायदा मिळावा असा त्यांचा उद्देश आहे. जिओ, एअरटेल आणि व्हीआयनं आपले कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान सादर केले आहेत, त्यानंतर बीएसएनएलने देखील आपले कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लान सादर केलेत.

बीएसएनएलनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना केवळ कॉलिंग आणि एसएमएस-ओन्ली रिचार्ज प्लान सादर केलेत. बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अत्यंत स्वस्त कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लान देत आहे. बीएसएनएलच्या या प्लानची किंमत फक्त ४३९ रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊया यात मिळणाऱ्या फायद्यांविषयी.

बीएसएनएलचा ४३९ रुपयांचा प्रीपेड प्लान

बीएसएनएलचा ४३९ रुपयांचा प्लान ९० दिवस म्हणजेच पूर्ण ३ महिन्यांची वैधता घेऊन येतो. ९० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच ३०० फ्री एसएमएसचा ही लाभ मिळतो. या प्लानमध्ये युजरला कोणत्याही प्रकारच्या डेटाचा फायदा मिळत नाही.

बीएसएनएलचा हा ४३९ रुपयांचा प्लान एअरटेल, जिओ आणि व्हीआयच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहे. यासोबतच बीएसएनएल आपल्या प्लानमध्ये लोकांना अधिक वैधता देखील देत आहे.

टॅग्स :बीएसएनएल