बीएसएनएलनं आपल्या युझर्ससाठी नवीनं सिनेमाप्लस ओटीटी एन्टरटेन्मेंट पॅक (Cinemaplus OTT Entertainment Packs) लाँच केलाय. यासाठी कंपनीनं लायन्सगेट, शीमारू, हंगामा आणि एपिकॉन सारख्या ओटीटी कंपन्यांसोबत करार केलाय. देशभरात कमी किंमतीत ओटीटी कन्टेंट उपलब्ध करून देणं हा यामागील उद्देश आहे.
बीएसएनएल सिनेमाप्लस यापूर्वी YuppTV Scope नावानं ओळखले जायचे. हे वन स्टॉप डेस्टिनेशन प्रमाणे काम करत होतं. परंतु YuppTV एकच प्रीमिअम पॅक ऑफर करत होते आणि याची किंमत २४९ रुपये होते. परंतु आता बीएसएनएल सिनेमाप्लस एक इंटिग्रेटेड इंटरफेस प्रदान करतं,ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना झी फाईव्ह, सोनी लिव, यप टीव्ही, डिस्नेप्लस हॉटस्टार, शिमारू मी, हंगामा, लायन्सगेट प्ले, एपिक ऑनसारख्या ॲप्सचा लाभ घेता येईल.
किंमत ४९ रुपयांपासून
बीएसएनएल आपल्या ग्राहकांना तीन प्लॅन ऑफर करत आहे. यातील एक प्लॅनची निवड केल्यानंतर, फायबर कनेक्शनशी निगडीत रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पॅकशी निगडीत ओटीटी सेवा सक्रिय होतील. सबस्क्रिप्शन फी मासिक चार्जमद्ये सामिल होतील. बीएसएनएल सिनेमापर्लसमध्ये युझर्सना स्टार्टर पॅक, फुल पॅक आणि प्रीमिअम पॅकचा लाभ मिळतो. याची किंमत ४९,१९९ आणि २४९ रुपयांपासून सुरू होते.
स्टार्टर पॅक
जर तुम्ही स्टार्टर पॅक घेतला तर याची किंमत ४९ रुपये (ओरिजनल किंमत ९९ रुपये) आहे. यामध्ये तुम्हाला शिमारू, हंगामा, लायन्सगेट आणि ईपीआयसी ऑन ओटीटी सेवांचा लाभ घेऊ शकता.
फुल पॅक
या पॅकची किंमत १९९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला झी फाईव्ह प्रीमिअम, सोनी लिव प्रीमिअम, यप टीव्ही आणि हॉटस्टारची सुविधा मिळेल.
प्रीमिअम पॅक
याची किंमत २४९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ॲमेझॉन, नेटफ्लिक्स सोडून बहुतेक ओटीटी सुविधांचा लाभ मिळतो. यामध्ये झी, सोनी, यप टीव्ही, शिमारू, हंगामा, लायन्सगेट आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. यासाठी तुमच्याकडे एक ॲक्टिव्ह बीएसएनएल फायबर कनेक्शन असणं आवश्यक आहे.