Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL नं लाँच केला नवा रिचार्ज प्लान, ६ महिन्यांच्या वैधतेसह मिळणार अनलिमिडेट बेनिफिट्स, किंमत केवळ ‘इतकी’

BSNL नं लाँच केला नवा रिचार्ज प्लान, ६ महिन्यांच्या वैधतेसह मिळणार अनलिमिडेट बेनिफिट्स, किंमत केवळ ‘इतकी’

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लान्ससाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:33 IST2025-03-12T16:33:54+5:302025-03-12T16:33:54+5:30

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लान्ससाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

BSNL launches new recharge plan unlimited benefits with 6 months validity price is only 750 rs | BSNL नं लाँच केला नवा रिचार्ज प्लान, ६ महिन्यांच्या वैधतेसह मिळणार अनलिमिडेट बेनिफिट्स, किंमत केवळ ‘इतकी’

BSNL नं लाँच केला नवा रिचार्ज प्लान, ६ महिन्यांच्या वैधतेसह मिळणार अनलिमिडेट बेनिफिट्स, किंमत केवळ ‘इतकी’

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लान्ससाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी खास रिचार्ज प्लॅन आणला आहे.

बीएसएनएलनं लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना पूर्ण ६ महिन्यांची वैधता मिळते. अशा परिस्थितीत जे लोक दीर्घ वैधता असलेल्या चांगल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहेत, त्यांना हा प्लान आवडू शकतो. चला जाणून घेऊया बीएसएनएलच्या नव्या प्लानबद्दल.

बीएसएनएलचा नवा रिचार्ज प्लान

बीएसएनएलनं लाँच केलेला नवीन रिचार्ज प्लान बीएसएनएलचा ७५० रुपयांचा प्लान आहे. ७५० रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्संना पूर्ण ६ महिन्यांची वैधता मिळते. यामध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएसचा फायदा मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झालं तर युजर्संना या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटाचा फायदा मिळतो. तर डेली डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्स ४० केबीपीएस च्या स्पीडवर डेटा वापरू शकतात.

कोणत्या युजर्सला मिळणार फायदा?

बीएसएनएलनं लाँच केलेला नवीन ७५० रुपयांचा प्लान सर्व बीएसएनएल युजर्ससाठी नाही. बीएसएनएलनं हा रिचार्ज प्लान फक्त जीपी-२ ग्राहकांसाठी लाँच केला आहे म्हणजेच केवळ बीएसएनएल जीपी-२ ग्राहकच हा प्लॅन खरेदी करू शकतात.

Web Title: BSNL launches new recharge plan unlimited benefits with 6 months validity price is only 750 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.