BSNL Recharge Plan: ट्रायनं काही दिवसांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस-ओनली रिचार्ज प्लान्स आणण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लान आणले ज्यात युजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो. ट्रायच्या या आदेशाचा फायदा डेटा न वापरणाऱ्यांना होणार आहे.
ट्रायच्या या आदेशानंतर भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनंही डेटाशिवाय रिचार्ज प्लान सादर केले, ज्यात बीएसएनएलचा ९९ रुपयांचा प्लान आणि बीएसएनएलचा ४३९ रुपयांचा रिचार्ज प्लान चा समावेश होता. आता बीएसएनएलने आणखी दोन असे रिचार्ज प्लान आणले आहेत, ज्यात युजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना कोणतंही डेटा बेनिफिट मिळणार नाही.
बीएसएनएल डेटा फ्री प्लान
बीएसएनएल बिहारनं आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करताना दोन नवीन प्लान्सची माहिती दिली आहे. बीएसएनएलच्या या दोन नव्या रिचार्ज प्लानची किंमत १४७ आणि ३१९ रुपये आहे.
१४७ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलच्या १४७ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना ३० दिवसांची वैधता मिळते. ३० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.
३१९ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलच्या ३१९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना ६५ दिवसांची वैधता मिळते. ६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएसचा फायदा मिळतो.