Join us

BSNL: कमी पैशात जास्त इंटरनेट, BSNL चे १००० MB डेटा देणारे २ प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 4:17 PM

बीएसएनएल सेवा ही सरकारी कंपनी असल्याने कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदा देणारी सेवा कंपनी मानले जाते.

स्मार्टफोनच्या जमान्यात इंटरनेट सुविधा ही काळाजी गरज बनली आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी मोफत इंटरनेट देणाऱ्या कंपन्या आता महिन्यात दाबून भाडे आकारणी करत आहेत. महिना, दोन महिने आणि तीन महिन्यांच्या इंटरनेट प्लॅनला सध्या जोराची मागणी आहे. त्यानुसार, कंपन्या पॅकेज देतात. बाजारात एअरटेल, आयडिया-वडाफोन, जिओ यांसह सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलनेही ग्राहकांना विविध प्लॅन दिले आहेत. आता, BSNL कंपनीने तब्बल १००० जीबी डेटा प्लॅन सुरू केला आहे. 

बीएसएनएल सेवा ही सरकारी कंपनी असल्याने कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदा देणारी सेवा कंपनी मानले जाते. आज तुम्हाला बीएसएनएलच्या २ प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती देण्यात येईल. या दोन्ही प्लॅनची किंमत ४०० रुपयांपेक्षाही कमी आहे. मात्र, फायदा हजारो रुपयांच्या सुविधांचा मिळणार आहे. या यादीतील पहिल्या प्लॅनची किंमत ३२९ रुपये आणि दुसऱ्या प्लॅनची किंमत ३९९ रुपये आहे. 

३२९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन असून एंट्री लेव्हलचा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना २० एमबीपीएसच्या स्पीडने १००० जीबी डेटा मिळतो. त्यासोबतच, युजर्संना अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगची सुविधाही मिळते. तसेच, हा डेटा संपल्यानंतर २ एमबीपीएसच्या सुविधेसह इंटरनेट सेवाही सुरुच राहते. 

३९९ रुपयांचा प्लॅनही ब्रॉडबँड असून हा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना ३० एमबीपीएस स्पीडने १००० जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळते. तर, डेटा संपल्यानंतर २ एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट सुविधाही सुरूच राहते. ज्यांना जास्तीच्या इंटरनेटची गरज आहे, त्यांनी हे दोन्ही प्लॅन वापरणे सोयीस्कर आणि फायदेशीर ठरेल.  

टॅग्स :बीएसएनएलइंटरनेटमोबाइल