BSNL New Recharge Plan : जिओची बाजारात एन्ट्री झाल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या. सुरुवातीचे काही वर्ष ग्राहकांची चंगळ होती. मात्र, जसजसे दिवस जाऊ लागले तसे मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होऊ लागले. इतकच नाही तर तुम्ही वापरत नसलेल्या सुविधांचेही आता पैसे मोजावे लागत आहे. म्हणजे तुम्ही फक्त बोलण्यासाठी रिचार्ज टाकू शकत नाही. तर त्यासोबत तुम्हाला इंटरनेट बॅलन्सही येतो. अजूनही फिचर फोन वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा परिस्थितीत इंटरनेट वापरत नसूनही त्यांना त्याचे पैसे भरावे लागत आहेत. यावरुन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने कठोर निर्णय घेतला. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंगचे रिचार्ज प्लॅन बाजारात आणण्याचे आदेश दिलेत. मात्र, बहुतेक कंपन्यांच्या किमतीत फार बदल दिसत नाही. बीएसएनएलने मात्र यात पुढाकार घेऊन सर्वात स्वस्त प्लॅन सादर केला आहे.
अलीकडेच ट्राय सर्व दूरसंचार कंपन्यांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणारे स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले होते. भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने केवळ कॉलिंग आणि एसएमएस फायद्यांसह सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
BSNL आधीपासूनच आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी लोकांमध्ये लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत, बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांसाठी स्वस्त कॉलिंग आणि एसएमएस फायद्यांसह रिचार्ज योजना आणल्या आहेत. आता BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक अतिशय स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. तुम्ही बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. याची किंमत अवधी ९९ रुपये आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमुळे इतर कंपन्यांना पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे.
९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय येणार?ट्रायच्या आदेशानुसार बीएसएनएलने हा ९९ रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन एक प्रकारचा कॉलिंग व्हाउचर आहे. कारण या प्लानमध्ये यूजर्सना फक्त अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये यूजरला १७ दिवसांची वैधता मिळते. कॉलिंग व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे समाविष्ट नाहीत.
बीएसएनएल बेस्ट प्लॅन कुठले?जर तुम्हाला बीएसएनएलचा डेटा फ्री प्लान घ्यायचा असेल तर तुम्ही BSNL चा ४३९ रुपयांचा प्लान खरेदी करू शकता. बीएसएनएलच्या या प्लॅनची वैधता ९० दिवसांची आहे. ९० दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला अमर्यादित कॉलिंग आणि ३०० मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.