नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने ( BSNL) हा सणासुदीचा काळ युजर्ससाठी आणखी खास बनवण्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. या बीएसएनएल ऑफर (BSNL Offer)अंतर्गत, कंपनी आपल्या निवडलेल्या प्लॅनसह एक्स्ट्रा व्हॅलिडिटी आणि एक्स्ट्रा डेटा देत आहे. ही ऑफर किती दिवस चालेल आणि बीएसएनएलचे कोणते प्लॅन आहेत? यासोबत अतिरिक्त वैधता आणि डेटा दिला जात आहे, याबाबतची माहिती जाणून घ्या...
BSNL 247 Planया बीएसएनएल प्रीपेड प्लानसह, कंपनी या सणासुदीच्या काळात 5 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देत आहे. फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास, हा प्लान 50 जीबी हाय स्पीड डेटासह येतो, डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड कमी होऊन 80 Kbps राहील.
याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, तुम्ही BSNL Tunes आणि Eros Now च्या स्ट्रीमिंगचा देखील लाभ घेऊ शकता. 6 नोव्हेंबर पर्यंत हा प्लॅन युजर्संना 35 दिवसांची व्हॅलिडिटी देईल.
BSNL 398 Planया प्लॅनसोबत कोणत्याही स्पीड लिमिटचा अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. हा प्लॅन 35 दिवसांसाठी व्हॅलिडिटी ऑफर करत आहे.
BSNL 1999 Planया प्लॅनसह, दूरसंचार कंपनी बीएसएनएल या ऑफर कालावधी दरम्यान 30 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. हा कंपनीची वार्षिक प्लॅन आहे, जो 600 जीबी हाय-स्पीड डेटा देतो, डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80 Kbps होईल, सोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.
या व्यतिरिक्त, युजर्संना अनलिमिटेड सॉन्ग चेंजसोबत फ्री PRBT ची सुविधा आणि 60 दिवसांसाठी Lokdhun कंटेंटच्या अॅक्सेससह 365 दिवसांसाठी EROS NOW Entertainment चा सुद्धा अॅक्सेस दिला जात आहे. या सणाच्या ऑफर कालावधीत, युजर्संना 395 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.
या प्लॅनसोबत एक्स्ट्रा डेटाचा फायदा485 आणि 499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज अनुक्रमे 0.5 जीबी आणि 1 जीबी डेटा मिळेल. त्यानुसार, हा प्लॅन युजर्सला दररोज 1.5 जीबी आणि 3 जीबी डेटा मिळेल.
499 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रतिदिन 3 जीबी डेटासह 35 दिवसांची व्हॅलिडीटी, तर 485 रुपयांच्या प्लॅनसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह एक्स्ट्रा डेटा जोडून तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटाचा लाभ मिळेल.