Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा

५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा

BSNL Recharge Plans : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. सध्या कंपनीकडे अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 02:24 PM2024-11-01T14:24:51+5:302024-11-01T14:24:51+5:30

BSNL Recharge Plans : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. सध्या कंपनीकडे अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आहेत.

BSNL plan for less than Rs 500 Extra data with longer validity 75 days free calling sms | ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा

५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा

BSNL Recharge Plans : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सध्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. बीएसएनएलच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे अनेकजण आपले नंबर बीएसएनएलवर पोर्ट करून घेत आहेत. बीएसएनएल इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे. अशा तऱ्हेनं अनेकजण बीएसएनएलला अधिक पसंती देत आहेत. जुलैपासून बीएसएनएल युजर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी विविध प्लॅन लाँच केले आहेत. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ७५ दिवसांची वैधता मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला एक्स्ट्रा डेटाही मिळणार आहे. आम्ही बोलत आहोत बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल.

बीएसएनएलचा ४९९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ७५ दिवसांच्या वैधतेसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसंच दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला बीएसएनएल ट्यून आणि Gameium Premiumचा ही फायदा मिळतो.

अतिरिक्त डेटादेखील मिळतो

बीएसएनएलचा ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन बीएसएनएल सेल्फकेअर अॅपद्वारे खरेदी केल्यास प्लॅनमध्ये ३ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. हा अतिरिक्त डेटा तुम्ही ७५ दिवसांच्या वैधतेत केव्हाही वापरू शकता.

Web Title: BSNL plan for less than Rs 500 Extra data with longer validity 75 days free calling sms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.