Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाहा १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे BSNL चे प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा

पाहा १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे BSNL चे प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा

पाहा कोणते आहेत प्लॅन्स आणि आणखी कोणती मिळतात बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 03:40 PM2021-04-04T15:40:54+5:302021-04-04T15:40:54+5:30

पाहा कोणते आहेत प्लॅन्स आणि आणखी कोणती मिळतात बेनिफिट्स

bsnl prepaid plan under 100 rupees with up to 2gb per day data airtel jio vi competition | पाहा १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे BSNL चे प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा

पाहा १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे BSNL चे प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा

Highlightsयामध्ये ९७ रूपयांचा प्लॅन अधिक लोकप्रिय आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांना टक्कर देत आहे. BSNL च्या काही जबरदस्त प्लॅन्सबद्दल आपण यापूर्वीही माहिती घेतली आहे. आज आपण पाहूया BSNL चे असे काही प्लॅन्स ज्याची किंमत १०० रूपयांपेक्षाही कमी आहे. 

BSNL च्या ९७ रुपयांचा प्लॅन हा खुप लोकप्रिय आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तसंच यात रोज २ जीबी डेटाही मिळतो. यामध्ये युझर्सला एकूण ३६ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस, तसंच लोकधून कंटेन्टची सुविधाही देण्यात येते. 

BSNL च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता प्रत्येक युझरला मिळणार Super Fast Internet

९८ रूपयांचा प्लॅन

BSNL च्या ९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये केवळ डेटा देण्यात येतो. याची वैधता ही २२ दिवसांची आहे. यात दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. यात एकूण ४४ जीबी डेटा मिळतो. दररोजची मर्यादा संपल्यानंतर याचा स्पीड कमी होऊन ४० केबीपीएस इतका होता. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएसची कोणतीही सुविधा मिळत नाही. या प्लॅनसोबत EROS NOW चं सबस्क्रिप्शनही मिळतं. 

९९ रूपयांचा प्लॅन

BSNL चा ९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये केवळ व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याची वैधताही २२ दिवसांची आहे. या प्लॅनसोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा देण्यात येते. याशिवाय मोफत कॉलर ट्यून सेवाही मिळते. या प्लॅनसोबत डेटा देण्यात येत नाही. 

Web Title: bsnl prepaid plan under 100 rupees with up to 2gb per day data airtel jio vi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.