सरकारी दूरसंचार कंपनी BSNL रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांना टक्कर देत आहे. BSNL च्या काही जबरदस्त प्लॅन्सबद्दल आपण यापूर्वीही माहिती घेतली आहे. आज आपण पाहूया BSNL चे असे काही प्लॅन्स ज्याची किंमत १०० रूपयांपेक्षाही कमी आहे. BSNL च्या ९७ रुपयांचा प्लॅन हा खुप लोकप्रिय आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तसंच यात रोज २ जीबी डेटाही मिळतो. यामध्ये युझर्सला एकूण ३६ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस, तसंच लोकधून कंटेन्टची सुविधाही देण्यात येते.
BSNL च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता प्रत्येक युझरला मिळणार Super Fast Internet९८ रूपयांचा प्लॅनBSNL च्या ९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये केवळ डेटा देण्यात येतो. याची वैधता ही २२ दिवसांची आहे. यात दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. यात एकूण ४४ जीबी डेटा मिळतो. दररोजची मर्यादा संपल्यानंतर याचा स्पीड कमी होऊन ४० केबीपीएस इतका होता. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएसची कोणतीही सुविधा मिळत नाही. या प्लॅनसोबत EROS NOW चं सबस्क्रिप्शनही मिळतं.
९९ रूपयांचा प्लॅनBSNL चा ९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये केवळ व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याची वैधताही २२ दिवसांची आहे. या प्लॅनसोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा देण्यात येते. याशिवाय मोफत कॉलर ट्यून सेवाही मिळते. या प्लॅनसोबत डेटा देण्यात येत नाही.