BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अलीकडच्या काळात बीएसएनएलच्या स्वस्त रिचार्ज प्लानमुळे बीएसएनएल युजर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक जण आपला नंबर बीएसएनएलवर पोर्ट करत आहेत. बीएसएनएल इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. तर दुसरीकडे बीएसएनएलही आपल्या ४जी आणि ५जी नेटवर्कवर अतिशय वेगानं काम करत आहे. बीएसएनएलही लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार आहे.
बीएसएनएलचे आपल्या युजर्ससाठी अनेक परवडणारे रिचार्ज प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या एका रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला ९०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत पूर्ण ६ महिन्यांची वैधता मिळणार आहे. फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर बीएसएनएलचा हा प्लान फायद्याच्या बाबतीतही सर्वोत्तम आहे. आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या ८९५ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत.
हेही वाचा - इडली विकून ही व्यक्ती महिन्याला कमावते ७.५ लाख
८९५ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलचा ८९५ रुपयांचा हा प्लान पूर्ण १८० दिवसांच्या वैधतेसह येतो म्हणजेच तुम्हाला पुढील ६ महिने रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण वैधतेसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. तसंच दररोज १०० फ्री एसएमएसचा ही लाभ मिळणार आहे. डेटाबद्दल बोलायचं झालं तर बीएसएनएलच्या या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ९० जीबी डेटाचा फायदा मिळेल. बीएसएनएलचा हा प्लान त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्यांना जास्त डेटाची गरज नाही.