Join us  

डेटा, कॉलिंग, SMS ही कंपनी देतेय १०० रुपयांच्या आतील स्वस्त आणि मस्त प्लॅन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 2:29 PM

BSNL Recharge Plan: बीएसएनएलने आपल्या काही प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. तरीही इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन्स बऱ्यापैकी स्वस्त आहेत.

नवी दिल्ली - बहुतांश टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या वर्षी आपल्या टॅरिफच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. मात्र त्यावेळी बीएसएनएलने रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ केली नव्हती. मात्र हल्लीच बीएसएनएलने आपल्या काही प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. तरीही इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन्स बऱ्यापैकी स्वस्त आहेत.

बीएसएनएलचे प्लॅन्स स्वस्त असण्याचं कारण हे ४जी डेटा न मिळणं हेसुद्धा आहे. जर तुम्ही ३जी डेटावर काम करत असाल तर बीएसएनएलचे प्लॅन्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक असे प्लॅन्स आहेत, जे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. अशाच काही प्लॅन्सची डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंग असे दोन्ही बेनिफिट्स मिळतात. बीएसएनएलचा ४९ रुपयांचा प्लॅनकंपनीच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये हा सर्वात अफोर्डेबल प्लॅन आहे. जर तुमची गरज केवळ सिमकार्ड अॅक्टिव्ह ठेवण्यापुरती असेल तर हा प्लॅन तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला २० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच १०० मिनिटे व्हाईस कॉलिंग आणि १जीबी डेटा मिळतो. बीएसएनएलचा एसटीव्ही ८७ एसटीव्ही ८७ मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग रोज १जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. या रिचार्जसोबत BSNL Hardy Mobile Gaming सर्व्हिससुद्धा देते. बीएसएनएलचा एसटीव्ही ९९ प्लॅन बीएसएनएलच्या ९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युझर्सना १८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि पीआरबीटी सुविधादेखिल मिळते. या प्लॅनमध्ये कुठल्याही प्रकारचे डेटा आणि एसएमएस बेनेफिट मिळत नाही. आधी या प्लॅनची वैधता २२ दिवस होती. ती घटवून आता १८ दिवस करण्यात आली आहे. 

टॅग्स :बीएसएनएलमोबाइल