सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक योजना पुन्हा आणली आहे. कंपनीनं सर्वात स्वस्त ब्रॉडबॅन्ड प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. बीएसएनएलनं आपला सर्वात लोकप्रिय प्रमोशनल भारत फायबर (एफटीटीएच) ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन- फायबर बेसिक, फायबर व्हॅल्यू, फायबर प्रीमियम आणि फायबर अल्ट्रा हे प्लॅन्स सर्व टेलिकॉम क्षेत्रात ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. तर जाणून घेऊया भारत फायबर ४४९ या प्लॅनबद्दल.
४४९ रूपयांचा प्लॅन हा सर्वात लोकप्रिय प्लॅन आहे. यामध्ये कंपनीनं मोठा बदल केला आहे. दरम्यान, या प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना सहा महिन्यांनंतर ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये मायग्रेट करण्याची गरज भासणार नाही. तसंच ग्राहकांना सध्याचा प्लॅन पुढे सुरू ठेवता येणार आहे. फायबर बेसिक प्लॅनसाठी ग्राहकांना वार्षिक शुल्कही देता येणार आहे. याचा फायदा म्हणजे ग्राहकांना यात १२ महिन्यांऐवजी १३ महिने सेवांचा लाभ घेता येईल. या प्लॅनचा फायदा ६ ऑक्टोबर पर्यंत घेता येईल.
ग्राहकांना ४९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ३३०० जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यामध्ये ग्राहकांना ३० एमबीपीएसचा स्पीडही मिळतो. याशिवाय FUP लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना २ एमबीपीएस स्पीडनं डेटा वापरता येतो. तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवाही दिली जाते.