Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसएनएलचे उत्पन्न घटले, तोटा मात्र तसाच; सरकारला पुनरुज्जीवनाची अजूनही आशा

बीएसएनएलचे उत्पन्न घटले, तोटा मात्र तसाच; सरकारला पुनरुज्जीवनाची अजूनही आशा

पाच वर्षांत भारत बीएसएनएलचे उत्पन्न सहा हजार कोटींनी कमी झाले आहे; परंतु, त्याचा तोटा मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:28 AM2022-12-15T10:28:24+5:302022-12-15T10:29:47+5:30

पाच वर्षांत भारत बीएसएनएलचे उत्पन्न सहा हजार कोटींनी कमी झाले आहे; परंतु, त्याचा तोटा मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे.

BSNL Revenue Drops, Losses Remain; The government still hopes for revival | बीएसएनएलचे उत्पन्न घटले, तोटा मात्र तसाच; सरकारला पुनरुज्जीवनाची अजूनही आशा

बीएसएनएलचे उत्पन्न घटले, तोटा मात्र तसाच; सरकारला पुनरुज्जीवनाची अजूनही आशा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यावर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतरही बीएसएनएलला तोटा होत आहे. गेल्या पाच वर्षांत भारत बीएसएनएलचे उत्पन्न सहा हजार कोटींनी कमी झाले आहे; परंतु, त्याचा तोटा मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे.

सरकारने लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये बीएसएनएलचे उत्पन्न २५,०७१ कोटी रुपये होते आणि तोटा ७,९९३ कोटी रुपये होता. यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत बीएसएनएलचे उत्पन्न ९,३६६ कोटी रुपये असून तोटा ३,५८९ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी १९,०५२ कोटींचे उत्पन्न होते आणि ६,९८२ कोटींचा तोटा झाला होता.  

नुकसान कशामुळे?
कर्मचाऱ्यांचे अधिक पगार, कर्जाचा ताण आणि काही क्षेत्र वगळता देशातील बहुतांश भागात फाेर-जी सेवेचा अभाव आणि खासगी मोबाइल सेवा प्रदात्यांची स्पर्धा यामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

तोटा कमी करण्यासाठी...
सरकार कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देणे, कर्जाची पुनर्रचना करणे, बाँड जारी करणे, फाेर-जी सेवांसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करणे आणि कोअर आणि नॉन- कोअर कंपन्यांना मालमत्ता विकून निधी उभारणे यामुळे बीएसएनएल तोट्यात राहिले नसल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: BSNL Revenue Drops, Losses Remain; The government still hopes for revival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.