सध्या अनेक दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत आहेत. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नं आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना न केवळ अधिक डेटा मिळतो, तर तुम्हाला अधिक वैधताही मिळते. बीएसएनएलचा हा रिचार्च प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.
ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल सातत्यानं काही ना काही नवे आणि स्वस्त प्लॅन्स घेऊन येते. कोरोना महासाथ आणि वर्क फ्रॉम होमच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने असे अनेक प्लॅन्स सादर केले आहेत, ज्यात अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. जर तुम्ही जास्त वैधता आणि अधिक डेटा असलेला प्लॅन शोधत असाल तर तुमचा बीएसएनएलनं एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. BSNL आपल्या ग्राहकांसाठी 1,999 रुपयांचा लाँग टर्म व्हॅलिडिटी प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंगसह डेटादेखील दिला जातो.
बीएसएनएलच्या 1,999 रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता मिळते. बीएसएनएलचा हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 600 जीबी डेटासह येतो. ग्राहकांना वर्षभर या डेटाचा वापर करता येणार आहे. या डेटामध्ये दैनंदिन वापराची मर्यादा नाही. यासह, या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात.
४४७ रूपयांचा नवा प्लॅनबीएसएनएलचा हा प्लॅन 60 दिवसांची वैधता आणि 100 जीबी बंडल डेटासह येतो. हा डेटा 60 दिवसांसाठी वापरला जाऊ शकतो. डेटावर दैनंदिन वापराची मर्यादा नाही. डेटा संपल्यानंतर, या प्लानमधील स्पीड 80Kbps पर्यंत कमी होतो. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. ग्राहकांना या योजनेसह BSNL Tunes आणि EROS Now सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.