Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio ला BSNL ची टक्कर; 'या' प्लॅनसोबत मिळतेय ९० दिवसांची अधिक वैधता आणि बरंच काही

Jio ला BSNL ची टक्कर; 'या' प्लॅनसोबत मिळतेय ९० दिवसांची अधिक वैधता आणि बरंच काही

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने देखील Jio शी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन ऑफर आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 03:57 PM2022-01-05T15:57:48+5:302022-01-05T15:58:07+5:30

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने देखील Jio शी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन ऑफर आणली आहे.

BSNL Rs 2,399 Prepaid Recharge Plan Now Offering 90 Days of Additional Validity | Jio ला BSNL ची टक्कर; 'या' प्लॅनसोबत मिळतेय ९० दिवसांची अधिक वैधता आणि बरंच काही

Jio ला BSNL ची टक्कर; 'या' प्लॅनसोबत मिळतेय ९० दिवसांची अधिक वैधता आणि बरंच काही

रिलायन्स जिओनं (Reliance Jio) अलीकडेच न्यू इयर ऑफर (New Year Offer) अंतर्गत 29 दिवसांची अतिरिक्त वैधता देण्याची घोषणा केली आहे. आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने देखील Jio शी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन ऑफर आणली आहे. BSNL आपल्या ग्राहकांना 90 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. BSNL 2,399 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे.

BSNL ने आपल्या अधिकृत BSNL हरियाणा ट्विटर हँडलवर या ऑफरची माहिती दिली आहे. कंपनीचा 2,399 रुपयांचा BSNL रिचार्ज प्लॅन अतिरिक्त 90 दिवसांच्या वैधतेसह आता 455 दिवसांसाठी वैध असे. या प्लॅनमध्ये यापूर्वी 60 दिवसांची अतिरिक्त वैधता देण्यात आली होती. ही ऑफर 15 जानेवारी 2022 पर्यंत वैध असून सध्या ती केवळ हरियाणा सर्कलसाठी उपलब्ध आहे.

काय मिळतं या प्लॅनमध्ये?
2399 रुपयांच्या प्लॅनसोबत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला 425 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 3GB हाय-स्पीड डेटा दिला जातो, म्हणजेच एकूण तुम्हाला या प्लॅनमध्ये 1,275GB डेटा दिला जातो. याशिवाय या प्लॅनसोबत Eros Now Entertainment चे सबस्क्रिप्शनही देण्यात येते आणि पर्सनलाईज्ड रिंग बॅक टोन (PRBT) सोबत अमर्यादित गाणे बदलण्याचा पर्याय देखील दिला जाईल.

Web Title: BSNL Rs 2,399 Prepaid Recharge Plan Now Offering 90 Days of Additional Validity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.