भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या प्रीपेड प्लॅनसह ग्राहकांना एक विशेष ऑफर देत आहे. या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 मार्च 2022 पर्यंत घेता येणार आहे. तुलनेनं थोड्या महाग असलेल्या दोन प्रीपेड प्लॅनवर ही ऑफर उपलब्ध आहे. हे दोन्ही प्लॅन्स अतिरिक्त वैधतेसह येत असून यात 2999 रुपये आणि 2399 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. पाहूया काय आहे यात खास.
BSNL 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 90 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसह ऑफर करत आहे. जर ग्राहकांनी 31 मार्च 2022 पूर्वी रिचार्ज केले तर त्याला 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह जवळपास तीन महिन्यांची मोफत सेवा दिली जाईल. सामान्यत: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. परंतु यामध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त वैधतेमुळे हा प्लॅन 455 दिवस चालेल. याशिवाय यामध्ये दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. परंतु याचा दररोजचा खर्च केवळ 6.59 रुपयेच येतो.
2399 रुपयांचा प्लॅन
BSNL कडून 2399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या सामान्य वैधतेसह येतो. 31 मार्च 2022 पर्यंत विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना या प्लॅनसह 60 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. त्यामुळे या प्लॅनची एकूण वैधता 425 दिवसांची असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, दररोज 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये दैनंदिन खर्च फक्त 5.64 रुपये आहे.