Join us  

BSNL चा धमाकेदार Plan! 797 रुपयांत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:02 PM

BSNL : आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका शानदार प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये युजरला कमी किंमतीत 395 दिवसांची वैधता मिळते आणि त्यासोबत अनेक बेनिफिट्सही मिळतात.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. प्लॅन्स इतके महाग झाले आहेत की लोक त्यांचे नंबर इतर कंपन्यांकडे पोर्ट करत आहेत. दरम्यान, बीएसएनएल (BSNL) ही एकमेव कंपनी आहे, जिने आपल्या प्लॅनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका शानदार प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये युजरला कमी किंमतीत 395 दिवसांची वैधता मिळते आणि त्यासोबत अनेक बेनिफिट्सही मिळतात.

BSNL Rs 797 Plan Detailsबीएसएनएलचा 797 रुपयांचा (BSNL Rs 797 Plan) प्लॅन 395 दिवसांच्या वैधतेसह येतो. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने अतिरिक्त 30 दिवसांची वैधता ऑफर करण्याची घोषणा केली आहे. युजर्संनी 12 जून 2022 पर्यंत प्लॅनची निवड केली तरच त्यांना अतिरिक्त वैधता मिळू शकेल. विशेष म्हणजे, युजर्स फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी सर्व फायदे मिळवू शकतील. 60 व्या दिवसानंतर, युजर्संना कॉल करण्यासाठी किंवा इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी टॉक टाइम किंवा डेटा प्लॅनची ​​निवड करावी लागेल.

BSNL Rs 797 Plan Benefitsजोपर्यंत बेनिफिट्सची बाब आहे, बीएसएनएलच्या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. 60 व्या दिवसानंतर, डेटाचा वेग 80 Kbps पर्यंत कमी होतो. आधी सांगितल्याप्रमाणे, प्लॅन अंतर्गत ऑफर केलेला डेटा आणि कॉलिंग फायदे 60 दिवसांनंतर संपतात, परंतु सिम अॅक्टिव्ह राहते.

Jio, Airtel आणि Vi चा वर्षभराचा प्लॅनVodafone Idea चा 1799 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 24GB डेटा आणि 3600SMS मिळतात. एअरटेलकडेही इतक्याच किंमतीचा प्लॅन आहे, ज्यामध्ये सुद्धा Vodafone Idea प्रमाणे बेनिफिट्स  मिळतात. याशिवाय Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन 365 दिवस मिळत आहेत.

टॅग्स :बीएसएनएलमोबाइलतंत्रज्ञानव्यवसाय