सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL खासगी कंपन्यांसोबतच्या स्पर्धेत राहण्यासाठी अनेक प्लॅन लाँच करत असते. युजरला कमी किंमतीत चांगला फायदा देण्यासाठी कंपनी स्वस्तातील रिचार्ज उपलब्ध करत असते. आताही बीएसएनएलने एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 100 रुपयांच्या आतील आहे. तसेच यामध्ये मोठी वैधता आणि डेटासह अन्य फायदेही देण्यात आले आहेत. (BSNL affordable plan; 3GB data, 75 days validity, and more)
बीएसएनएलने 94 रुपयांत हा प्लॅन उपलब्ध केला आहे. यामध्ये 75 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच अडीज महिन्यांची. तसेच या काळासाठी 3 जीबी डेटादेखील देण्यात आला आहे. हा डेटा तुम्ही 75 दिवसांत वापरू शकता. याशिवाय युजर व्हॉईस कॉलिंग देखील करू शकतात. मात्र, ते अनलिमिटेड नाहीय.
यामध्ये कॉल करण्यासाठी 100 मिनिटे मोफत देण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर बोलू शकता. ही मिनिटे संपली की त्यापुढील प्रत्येक मिनिटासाठी 30 पैसे आकारले जाणार आहेत. याचसोबत प्लॅनमध्ये नॅशनल रोमिंगही देण्यात आले आहे.
केवळ फोन कॉल, डेटा आणि मुदतच नाही तर या प्लॅनमध्ये पर्सनलाईज रिंग बॅक टोन (PRBT) ची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा 60 दिवसांसाठी मिळणार आहे.
अन्य प्लॅन...
BSNL युझर्सना ५९९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त १ जीबी डेटा देण्यात येत आहे, या प्लॅनचं नाव 'STV_WFH_599' असं आहे. यामध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि दररोज ५ जीबी डेटा देण्यात येतो. अन्य कोणतीही कंपनी ८४ दिवसांच्या प्लॅनमध्ये इतका डेटा देत नाही. या प्लॅनसोबत मिळणाऱ्या डेटानुसार ग्राहकांना प्रत्येक जीबीसाठी केवळ १.४२ रूपयांचा खर्च येतो. यासोबतच ग्राहकांना Zing चं फ्री बेनिफिटही देण्यात येतं.
जर तुम्हाला हा डेटा कमी पडत असेल तर तुम्ही २५१ रूपयांमध्ये अॅड ऑन डेटा व्हाऊचरही खरेदी करू शकता. या व्हाऊचरचं नाव 'DATA_WFH_251' आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच या प्लॅनसोबत ७०जीबी डेटा आणि झिंगचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. फक्त इतर कंपन्यांच्या तुलनेत सध्या बीएसएनएलकडे पॅन इंडिया ४जी सेवा नाही.